गुढीपडावा निमित्त आनंदाची बातमी; 1 एप्रिल पासून वीजदरात 20% कपात, नवीन वीज दर लागू, पहा डिटेल्स प्रतियुनिट पैसे | Mahavitaran Light Bill Unit Rate

Mahavitaran Light Bill Unit Rate : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय राज्य वीज नियामक आयोगाने घेतला आहे. घरगुती वापराच्या वीजदरात आयोगाने 20 टक्क्यांनी कपात केली आहे. यापुढे सव्वादोन रुपये प्रति युनिट वीज स्वस्त होणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahavitaran Light Bill Unit Rate

महाराष्ट्र राज्य सरकारने महावितरण मार्फत वीज नियामक आयोगास वीजदर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आयोगाने हा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेचा पडावा गोड केला आहे. वीजदरकपातीचा निर्णय वीज नियामक आयोगाने शुक्रवारी दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवार, 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. 

MSEB Bill Unit Rate

राज्य सरकारने सौरऊर्जा निर्मितीस प्रोत्साहन दिले आहे . त्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून राज्यात सौरऊर्जाचे उत्पादन मोठा प्रमाणात वाढेल आहे. परिणामी, शेतकऱ्यांना दिवस वीज आणि सर्व ग्राहकांना स्वस्त वीज हे धोरण आहे. त्यामुळेच महावितरण कंपनीने वीज दरकपातीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. 

सदर प्रस्तावावर आयोगाने नुकताच निर्णय घेतला आहे. महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक वीजदराबाबत प्रस्ताव 22 जानेवारी 2025 रोजी दाखल केला होता. 25 फेब्रुवारी ते 4 मार्च 2025 या कालावधीत सुनावणी घेण्यात आली तर 28 मार्च रोजी या प्रस्तावास मान्यता दिली आहे. राज्यात सौरऊर्जा उत्पादन वाढले आहे. 

  • औद्योगिक वीजदरात 15 टक्के कपात 
  • कमर्शिअल वीजदरात 31 टक्के कपात 
  • कृषीपंप वीज मात्र 18 टक्क्यांनी महागणार 

रुफटॉप सोलर, मुख्यमंत्री सौरवाहिनी, सौरकृषी पंप आणि सौर उपकेंद्र, अशा विविध माध्यमातून सौरऊर्जा निर्मिती मोठा प्रमाणात सुरु आहे. परिणामी, शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज उपलब्ध होत आहे. या माध्यमातून कृषिपंपाचा वापर सौरऊर्जाकडे वाळविल्याने पारंपरिक ऊर्जा मोठया प्रमाणात उपलब्ध होत आहे. परिणामी कृषी पंप सोडून घरगुती औदयोगिक आणि सर्व्ह ग्राहकांना स्वस्तात वीज देण्याचा धोरणात्मक निर्णय राज सरकारने घेतला आहे. 

या निर्णयानुसार महावितरण कंपनीने वीज आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावास शुक्रवारी हिरवा कंदील दिला. 

Mahavitaran Light Bill Unit Rate वीज आयोगाच्या निर्णयाने उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांसाठी २०२५-२६ या सालासाठी 15 टक्के कपात केली आहे. तर उच्च व लघुदाब घरगुती ग्राहकांसाठी 20 टक्के कपात केली आहे. लघुदाब व उच्चदाब कमर्शियल ग्राहकांना 31 टक्के कपात केली आहे. या निर्णयामुळे ऐन उकाड्यात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

सध्या 11 रुपये 16 पैसे असणारा घरगुती वीज दर 9 रुपये 69 पैसे राहणार आहे. 1 ते 100 युनिटचा घरगुती दर 8 रुपये 14 वरून 7 रुपये 32 पैसे करण्यात आला आहे. 2027 मध्ये 7 रुपये 15 पैसे, 2028 मध्ये 7 रुपये 6 पैसे, 2029 मध्ये 6 रुपये 5 पैसे आणि 2030 मध्ये दर 6 रुपये 17 पैसे राहणार आहे.  

Mahavitaran Light Bill Unit Rate
Mahavitaran Light Bill Unit Rate
इतर सरकारी योजनांची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या नवीन नियमाची माहिती होईल आणि या माहितीचा त्यांना फायदा होईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Mahavitaran Light Bill Unit Rate

Leave a Comment