Mhada Commercial Shop मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आधीचा व्यवसाय वाढवायचा असेल, तर जागा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. यासाठीच म्हाडा (Mhada) वेळोवेळी दुकानं आणि कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव घेत असते. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने असते.
आजच्या स्पर्धात्मक काळात जर तुम्हाला मुंबई–पुण्यात स्वतःचं दुकान किंवा ऑफिस हवं असेल, तर म्हाडाचा ई-लिलाव ही एक उत्तम संधी आहे आणि आता ही संधी तुम्हाला मिळालेली आहे. आता ही हातातून जाऊ देऊ नका.
Mhada Commercial Shop
म्हाडाच्या पुणे मंडळाने (Mhada Pune) पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील 53 दुकाने आणि 28 कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावासाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रेला 24 जूनपासून सुरुवात झाली असून इच्छुकांनी 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करून या लिलावात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या लिलावाच्या माध्यमातून व्यावसायिकांना पुणे, सोलापूर आणि सांगलीसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दुकान (Mhada Commercial Shop) किंवा कार्यालयासाठी जागा मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजना; लाखो बहिणींना बसणार फटका, अपात्र यादी सरकारने केली जाहीर, संपूर्ण माहिती पहा.
“या” दिवशी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख
पुणे मंडळाकडून पुणे, सोलापूर आणि सांगली या शहरांमध्ये काही अनिवासी (व्यावसायिक वापरासाठीचे) गाळ्यांचे म्हणजेच दुकानांचे बांधकाम करण्यात आले आहे. या व्यावसायिक गाळ्यांच्या ई-लिलावासाठी 21 जून रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर 24 जूनपासून सकाळी 11 वाजता ऑनलाईन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
गेल्या 27 जूनपासून अर्ज सादर करण्याचा टप्पा सुरू झाला असून, इच्छुक व्यक्तींना 15 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. यानंतर 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लिलाव प्रक्रियेची सुरुवात होईल आणि ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. हा लिलाव संपल्यानंतर विजेत्यांची निवड केली जाणार असली तरी, अंतिम निकाल जाहीर करण्याची तारीख पुणे मंडळाने अद्याप स्पष्ट केलेली नाही. ही तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.Mhada Commercial Shop
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
हेही वाचा : क्लिक करा ⇒ आठवड्याचा पहिला दिवस, सोने पुन्हा स्वस्त! जाणून घ्या आजचे नवे दर आणि बाजाराची दिशा
“या” ठिकाणी दुकाने (Shops) उपलब्ध :
पुण्यातील मौजे म्हाळुंगे याठिकाणी असलेल्या 21.42 चौ. मीटर या आकाराच्या पाच दुकानांचा समावेश या ई-लिलावामध्ये करण्यात आला आहे. याशिवाय, पिंपरी वाघिरे, शिरूर (पुणे), अभयनगर (सांगली) आणि एसपीए-1 (सोलापूर) या ठिकाणांवरील दुकाने आणि कार्यालयीन गाळे देखील लिलावात सहभागी करण्यात आलेले आहे.
या ई-लिलावामध्ये, पुणे मंडळाने ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त बोली लावणारा अर्जदार विजेता ठरणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमधून पुणे मंडळाला चांगला महसूल मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.Mhada Commercial Shop
Disclaimer : वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.