महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) (MHADA lottery 2025 Mumbai) मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये मात्र केवळ 20 लाखांत घर उपलब्ध होणार आहे. शिवगंगा नगर आणि कोहोज कुंठवली येथे म्हाडा अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 2 हजार 531 घरे बांधणार आहे.
MHADA lottery 2025 Mumbai
शिवगंगा नगर येथे 925 सदनिका बांधण्यात येणार असून त्यापैकी 151 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. उर्वरित 774 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. कोहोज कुंठवली येथे 1 हजार 606 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध होणार आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणाऱ्या घरांच्या किमती 20 ते 22 लाख आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमती 45 ते 50 लाख रुपये असतील.
या दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. मार्च 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजित आहे. या प्रकल्पांमध्ये दुकानांसाठी गाळे, पार्किंग, मनोरंजन मैदान, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, पर्जन्यजल संचयन केंद्र, सेंद्रिय कचरा प्रक्रिया केंद्र, सौरऊर्जा यंत्रणा, इत्यादी सोयीसुविधा पुरवल्या जातील.
उत्पन्न गट | एकूण सदनिका | क्षेत्रफळ | किमंत |
अत्यल्प | 1757 फूट | 320 चौरस | 20 ते 22 लाख रुपये |
मध्यम | 774 | 650 ते 725 चौरस | 45 ते 50 लाख रुपये |
सर्वेक्षण करण्यात आले त्याला चांगला प्रतिसाद :
(MHADA lottery 2025 Mumbai) सदर प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी मागणी निर्धारण सर्वेक्षण करण्यात आले. यात शिवगंगा नगर येथील अत्यल्प उत्पन्न गटाच्या 151 घरांसाठी 683 जणांनी, तर याच प्रकल्पातील मध्यम उत्पन्न गटाच्या 774 सदनिकांसाठी 1 हजार 944 जणांनी स्वारस्य दाखवले.
कोहोज कुंठवली येथील अत्यल्प उत्पन्न गटाच्या 1 हजार 606 सदनिकांसाठी 2 हजार 748 जणांनी स्वारस्य दाखवले. त्यामुळे घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष सोडतीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा म्हाडाला आहे.
लवकरच घरांच्या लॉटरीची जाहिरात जारी केली जाणार |Upcoming mhada lottery 2025 mumbai
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने मुंबईत म्हाडाची एक नवीन लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच सदर घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
सदर म्हाडा लॉटरीसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे दिली आहे.
- PAN card.
- Aadhaar card.
- Domicile certificate.
- Income certificate.
- Photograph.
- E-Signature and acceptance letter.
- Cancelled cheque.MHADA lottery 2025 Mumbai
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA सेक्टर 12 नवीन 6452 परवडणारी घरे फेज 2 लॉटरी लवकरच
हे पण वाचा : क्लिक करा पुणे PMAY 2.0 अंतर्गत फेज 2, 4173 परवडणाऱ्या फ्लॅटसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||MHADA lottery 2025 Mumbai