सरकारची नवी योजना; 4 किंवा 7 दिवसाचा पास काढा, महाराष्ट्रात मनसोक्त कुठे ही फिरा, फक्त 1200 रुपये | MSRTC 4 days Pass Booking

MSRTC 4 days Pass Booking महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ “आवडेल तेथे कोठेही प्रवास” या योजनेअंतर्गत प्रवाशांना राज्यभर अतिशय अल्प दरात फिरण्याची संधी उपलब्ध करून देते. ही योजना 1988 पासून प्रवाशांसाठी राबवली जात आहे. या योजने अंतर्गत 7 दिवस आणि 4 दिवसांच्या कालावधीसाठी पास दिला जातो. यात साध्या आणि शिवशाही या दोन्ही प्रकारच्या बसमधून तुम्ही प्रवास करू शकता. परंतु त्यासाठी पासचे दर वेगवेगळे आहेत.      

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSRTC 4 days Pass Booking

आवडेल तेथे कोठेही प्रवास संपूर्ण माहिती :

शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाण्याचा प्लान करत आहेत. तसेच हा पर्यटनाचा देखील काळ आहे. या काळात अनेक लोक राज्यात विविध ठिकाणी हिल स्टेशनला फिरायला जातात. तुम्ही देखील राज्यात किंवा राज्याबाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

(MSRTC 4 days Pass Booking) कारण येथे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या म्हणजेच एसटी बसच्या एका खास पासविषयी माहिती देत आहोत. या पासच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता. 

MSRTC 4 days pass price

पासचे प्रकार :

दोन प्रकारचे पास देण्यात येते – 4 दिवसांचा पास आणि 7 दिवसांचा पास. या पासची किंमत वयानुसार आणि बसच्या प्रकारानुसार बदलते. 

प्रौढ व्यक्तींसाठी पास किंमत (4 दिवस) :

साधारण बस : रुपये 700 /-
निमआराम बस : रुपये 900 /- 
आराम बस / शिवनेरी : रुपये 1200 /-
आराम +निमआराम : रुपये 1500 /-
सर्व प्रकारच्या बसेस : रुपये 2000 /-

 

प्रौढ व्यक्तींसाठी पास किंमत (7 दिवस) :

साधारण बस : रुपये 1200/-
निमआराम बस : रुपये 1500 /- 
आराम बस / शिवनेरी : रुपये 2000 /-
आराम +निमआराम : रुपये 2500 /-
सर्व प्रकारच्या बसेस : रुपये 3500 /-

 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ Gold News ; सोन्याचा दर घसरला? 22, 24 कॅरेटचा आजचा भाव, जाणून घ्या सोनं खरेदीची योग्य वेळ

विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत : 

  • विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के सवलत (वैध विद्यार्थी ओळखपत्र सादर करणे आवश्यक)
  • 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 30 टक्के सवलत (वय सिद्ध करणारे प्रमाणपत्र आवश्यक)

MSRTC 4 days pass online booking

MSRTC ने ऑनलाईन पास सुविधा उपलब्ध करून दिले आहे. 

अधिकृत वेबसाईटवर www.msrtc.gov.in वर जा.
‘ट्रॅव्हल पास’ ऑप्शनवर क्लिक करा.
आवश्यक संपूर्ण माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा. 
तुम्ही बुक केलेला पास ई-मेलद्वारे प्राप्त होईल. MSRTC 4 days Pass Booking

 

MSRTC ने ऑफलाईन पास सुविधा खालीलप्रमाणे : 

जवळच्या ST आगरा मध्ये जाऊन पास काउंटर वर संपर्क करा.
आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा अन्य वैध ओळखळपत्र सादर करावे.
पास काढण्यासाठी आवश्यक अर्ज भरावा.
यानंतर पासच्या प्रकारानुसार निश्चित शुल्क भरावे.
कागदपत्रे आणि शुल्क तापसल्यानंतर पास जारी केला जाईल.

Disclaimer :
MSRTC 4 days Pass Booking वरील माहिती विविध स्रोतांमधून संकलित केली गेली आहे. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा शासकीय कार्यालयांतून सविस्तर माहिती घ्यावी. या योजनेच्या अटी व शर्ती, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया यांबद्दल स्वतः चौकशी करून खात्री करावी. या लेखातील माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आम्ही या माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही.

Leave a Comment