नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात मुद्रा लोन (mudra loan) म्हणजेच प्रधानमंत्री मुद्रा योजना (pradhan mantri mudra yojana in marathi) या केंद्र सरकारचे अतिशय महत्वाच्या योजनांपैकी एक असणारी योजना, यात आपण योजनेची पात्रता, लाभ, उद्धिष्ट, फायदे कोणत्या बँक शाखेतून लोन उपलब्ध होते या सर्व विषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. देशाच्या आर्थिक विकाससाठी महत्वाची अशी ही योजना याचे खास वैशिष्ट्य असे आहे की, या योजनेच्या माध्यमातून छोटे उद्योग, व्यवसाय, शेती व्यवसाय व इतर व्यवसाय सुरु करण्यासाठी मुद्रा लोन एप्रिल २०१४ मध्ये भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी सुरु केली.
देशातील तरुणांना व्यवसाय सुरु करताना सुरवातीला खूप अडचणी येतात म्हणून या योजनेच्या अंतर्गत ५० हजार ते १० लाखांपर्यन्त कर्ज देण्यात येते या कर्ज मागणाऱ्या व्यवसायीकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही.
मुद्रा लोन म्हणजे काय आहे | pradhan mantri mudra yojana in marathi
प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारच्या मार्फत एप्रिल २०१५ मध्ये सुरु करण्यात आलेली आहे या योजनेतून 50 हजार ते 10 लाखांपर्यन्त बँकेतून सुलभरीत्या कर्ज उपलब्ध होते भारत देशात अनेक छोटे मोठे, मध्यम उद्योग व्यवसाय करणारे आहेत जस की, सेवा उद्योगात गुंतलेले व्यवसाय, सूक्षम व्यवसाय, दुरुस्ती अस्थापन, ट्रकचे मालक, भाजी विक्रेता लघु उद्योग अशा अनेक प्रकारच्या व्यवसायिकांना मुद्रा लोन उपलब्ध होते. या योजनाचा मुख्य उद्देश देशातील तरुणांना उद्योग व्यवसायसाठी प्रोसाहन देण्यासाठी व्यवसायमध्ये भांडवल उभे करण्यासाठी सरकार लोन देत आहे. तरुणांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक अडचणी येतात त्यातील मुख्य अडचण भांडवल म्हणून केंद्र सरकार या योजनेच्या मार्फत आर्थिक साहाय्य करत आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची उद्दिष्टे | mudra loan scheme
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे भारतातील युवकांना उद्योग व व्यवसायकडे वळून नवनवीन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक कर्ज उपलब्ध करून देणे स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक भरभराटी व्हावी व देशाची आर्थिक व्यवस्था परिपूर्ण करणे हे उद्दिष्ट या योजने मागचे आहे.
- सेवा उद्योगात असणारे याना मार्गदर्शक सुविधी पुरविणे
- लहान व्यवसाय करणारे यांचा विकास करणे.
- कमी उत्पन्न गट असणाऱ्यांना आर्थिक मदत करणे.
- सुक्षम व लघु उद्योगांना आर्थिक कर्ज म्हणून मदत करणे.
- कृषी उपक्रम राबवण्यासाठी
- उद्योग आणि व्यवसायिकांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देणे.
मुद्रा लोन योजनेची थोडक्यात माहिती
१. | योजनेचे नाव | प्रधानमंत्री मुद्रा योजना (mudra loan) |
२. | योजना कधी चालू झाली | एप्रिल २०१५ |
३. | योजनेचा लाभ | कोणत्याही तारण किंवा सुरक्षते शिवाय ५० हजार ते १० लाखांपर्यन्त कर्ज |
४. | परतफेडीचा कालावधी | बँकेच्या विविध तत्वानुसार |
५. | योजनेचे प्रकार | शिशु कर्ज = ५०००० पर्यंत कर्ज |
किशोर कर्ज = ५०००० ते ५,००,००० पर्यंत कर्ज | ||
तरुण कर्ज ५,००,००० ते १०,००,००० पर्यंत कर्ज | ||
६. | व्याजदर | बँकेच्या नियमानुसार चालू असणारा इंटरेस्ट रेट |
७. | पात्रता | उद्योजक, उप्त्पादन, छोटे व्यापारी, सेवांचे उपक्रम |
८. | अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाईन |
९. | संकेतस्थळ | https://www.mudra.org.in/ |
मुद्रा लोन योजनेचे तीन प्रकारचे आहे | E mudra loan | shishu mudra
- शिशु कर्ज
शिशु या कर्जच्या प्रकारात ५० हजारपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते कर्ज परतफेडीचा विशेष कालावधी विविध बँकेच्या वेगवेगळ्या पर्यायवर अवलंबून असते त्याची सर्व माहिती बँकेच्या शाखेत मिळू शकते. - किशोर कर्ज
किशोर या प्रकारच्या कर्जामध्ये व्यवसायिकांना ५० हजार ते ५ लाखांपर्यन्त कर्ज उपलब्ध होते या कर्जचा परतफेडीचा कालावधी बँकेच्या पर्यायांवर अवलंबून असतो त्याची संपूर्ण माहिती जवळच्या बँक शाखेत मिळेल. - तरुण कर्ज
तरुण या प्रकारच्या कर्जामध्ये योजनेच्या मार्गदर्शक बाबीनुसार व्यवसायिकांना ५ लाख ते १० लाखांपर्यन्त कर्ज उपलब्ध होते, परत फेडीचा कालावधी बँकेच्या विविध तत्वानुसार अवलंबून असतो.
मुद्रा लोन योजने अंतर्गत बँक यादी | mudra loan apply
सार्वजनिक बँक यादी
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- कॅनरा बँक
- इंडियन बँक
- इंडियन ओव्हरसिस बँक
- पंजाब नॅशनल बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- युको बँक
- जमू अँड कश्मीर बँक
- आंध्र बँक
- कॉर्पोरेशन बँक
- स्टेट बँक ऑफ इंडिया
खाजगी बँक यादी
- ऍक्सिस बँक
- बंधन बँक
- सिटी युनियन बँक
- डिसिबी बँक
- धनलक्षमी बँक
- फेडरल बँक
- HDFC बँक
- ICICI बँक
- IDBI बँक
- IDFC बँक
- इंडसेन बँक
- कर्नाटक बँक
- कोटक महिंद्रा बँक
- आरबीएल बँक
- येस बँक
प्रादेशिक ग्रामीण भागातील सर्व बँका
मुद्रा योजने अंतर्गत समाविष्ट व्यवसाय /उद्योग /पात्र उपक्रम | pm mudra loan
वाहतूक वाहन
- वस्तूची आणि मालाच्या वाहतुकीसाठी वापरात येणारे वाहन प्रवासी लोकल वाहने जसे की, ऑटो रिक्षा, लहान, मध्यम वस्तू वाहतुकीसाठी तीन चाकी रिक्षा, टॅक्सी, इ – रिक्षा
- शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली जे फक्त व्यावसायिक वापरासाठी आहेत.
- व्यावसायिक वापरासाठी वापरली जाणारी दुचाकी
वैयत्तिक क्रियाकल्प (उद्योग व व्यवसाय)
१. | हेअर सलून | ब्युटी पार्लर |
२. | बुटीक | व्यायामशाळा |
३. | टेलर दुकान | ड्रायक्लीनिंग |
४. | ओषधी दुकान | सायकल आणि गैरेज |
५. | कुरिअर ऑफिस | फोटोचे दुकान |
६. | डीटीपी | झेरॉक्स दुकान |
अन्न व पदार्थ संबंधित क्षेत्र
१. | आचार बनविणे | पापड बनविणे |
२. | जॅम व जेली बनविणे | मिठाईचे दुकान |
३. | खाद्यपदार्थ हॉटेल | चहा दुकान |
४. | बर्फ बनविणे | आईसिक्रीम दुकान |
५. | ब्रॅड व पाव बनविणे | बेकरी दुकान |
कापड संबंधित क्षेत्र
१. | खादी उपक्रम | पारंपरिक भरतकाम |
२. | हातकाम | पारंपरिक रंगकाम |
३. | छपाई | साडी दुकान |
४. | साड्यांचे विविध उत्पादन | पॉवरलूम |
५. | विणकाम | फिनिशिंग |
६. | ऍक्सेसेरीएसचे उपक्रम | ब्लाउज शिवणे |
शेती संबंधित क्षेत्र
१. | पोल्ट्री | मत्स्यपालन |
२. | कुकुटपालन | मधमाशी पालन |
३. | डेअरी | कृषी चिकित्सालय |
४. | कृषी उद्योग | शेळी पालन |
५. | दूध व्यवसाय | शेती व्यवसाय केंद्र |
मुद्रा लोन योजनेसाठी लागणार कागदपत्रे | mudra loan documents
- अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- कायमस्वरूपी अर्ज पत्ता / राहण्याचा पुरावा
- व्यवसाय पत्ता
- अर्जदाराचे दोन फोटो
- व्यावसायिक उपक्रमाचा ओळखीचा पुरावा
- कोटेशन (उद्योगासाठी संबंधित वस्तूच्या खरेदीसाठी कर्ज घ्यायचे असल्यास)
मुद्रा लोनसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | mudra loan apply online
- मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी मुद्रा लोनच्या अधिकृत https://www.mudra.org.in/ वेबसाईटवर जाणे.
- पहिल्या पानावर तुम्हाला खाली तीन प्रकार दिसतील शिशु, किशोर आणि तरुण अर्जाचा नमुना डाउनलोडसाठी क्लीक करा.
शिशु कर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी क्लीक करा ⇐
किशोर कर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी क्लीक करा ⇐
तरुण कर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी क्लीक करा ⇐
- यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट आऊट काढावी लागले.
- त्यानंतर अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरावी लागले.
- यानंतर अर्जात दिलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागतील.
- पुढे लोनसाठी संपूर्ण भरलेला अर्ज तुमच्या जवळच्या कोणत्याही बँक शाखेत जमा करावा लागेल
- तुमच्या अर्जाची बँकेमार्फत अर्जाची १ महिनेच्या आत पडताळणी करून तुम्हाला कर्ज वितरित केले जाईल.
प्रधानमंत्री मुद्रा योजना चलन कार्ड
प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रकारात कर्ज प्राप्त झाल्यानंतर कर्जदाराला बँकेकडून एक मुद्रा कार्ड दिले जाते हे कार्ड हे आपल्या रोजच्या वापरातील असणारे डेबिट कार्डप्रमाणे तुम्ही मुद्रा कार्ड वापरू शकतात प्राप्तकर्त्याला बँकेकडून मुद्रा कार्डसाठी पासवर्ड दिला जाईल जो गोपनीय ठेवला पाहिजे तुम्ही तो पासवर्ड वापरून तुमच्या व्यवसायच्या गरजेनुसार एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मोकळे असेल.
lek ladki yojana | मुलींसाठी 1 लाख हवे आहे ? तर जाणून घ्या, लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता क्लिक करा.
ayushman bharat yojana | 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा | जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया, पात्रता, फायदे | घर बसल्या ऑनलाईन नोंदणी क्लिक करा.
FAQ’s :- प्रधानमंत्री मुद्रा योजने संदर्भातील प्रश्न व त्यांची उत्तरे
प्रश्न : मुद्रा लोनसाठी कोण पात्र आहे?
उत्तर : ज्यांचे छोटे उद्योग, व्यवसाय, सेवा उपक्रम असे सर्व पात्र आहे.
प्रश्न : मुद्रा लोनसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?
उत्तर : आधारकार्ड, पॅनकार्ड, राहण्याचा पत्ता पुरावा, व्यवसायाचा पत्ता, अर्जदाराचे दोन फोटो, व्यावसायिक उपक्रमाचा पुरावा.
प्रश्न : मुद्रा लोन व्याजदर किती आहे?
उत्तर : बँकेचे विविध तत्वानुसार व्याजदर असते.
प्रश्न : मुद्रा लोन कोणती बँक देते?
उत्तर : सार्वजनिक बँक, खाजगी बँक, ग्रामीण सर्व बँका.
प्रश्न : मुद्रा लोन किती दिवसात भेटते?
उत्तर : साधारण १ महिना.
सारांश
या लेखात आपण मुद्रा लोन (mudra loan) या विषयी माहिती पाहिली यात प्रधानमंत्री योजना काय आहे, या योजनेची उध्दीष्टे काय आहे, पात्रता काय आहे, कोणत्या कागदपत्रांची आवशक्यता असते अशा सर्व गोष्टीची माहिती देण्याचा पर्यंत केलेला आहे. केंद्र सरकारचा उद्देश युवकांना व्यवसायासाठी प्रोसाहन देण्याचा आहे. वरील माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा.