म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप, म्यानमार आणि बँकॉक अनेक इमारती जमीनदोस्त, विडिओ आले समोर | Myanmar Earthquake News In Marathi

Myanmar Earthquake News In Marathi बँकॉक: म्यानमार, थायलंड, बांग्लादेशात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात एक बहुमजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसत आहे. भूकंपाचे धक्के दिल्ली एनसीआरपर्यंत जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत केवळ 10 किलोमीटर खोलवर असल्यानं नुकसानाची तीव्रता वाढली. बँकॉकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Myanmar Earthquake News In Marathi

यूएसजीएसनं दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.50 वाजता म्यानमारच्या सागाइंग शहराच्या वायव्येला 16 किलोमीटर दूरवर जमिनीच्या 10 किलोमीटर खाली भूकंप झाला. बँकॉकमध्ये भूकंपानं मोठं नुकसान झालं आहे.  

म्यानमार भूकंप कशामुळे झाला?

असे म्हटले जाते कि म्यानमारमध्ये भूकंपाच्या धोक्याचे सर्वात मोठे कारण सागाईंग फॉल्ट आहे, जो एक प्रमुख फॉल्ट आहे, जो प्रामुख्याने भारतीय प्लेट आणि सुंडा प्लेट दरम्यान खंडीय उजव्या-बाजूच्या ट्रान्सफॉर्म फॉल्ट आहे. हा फॉल्ट म्यानमारमधून सुमारे 1200 किलोमीटर अंतरावर जातो.

इमारत कोसळून 43 जण अडकल्याची शक्यता :

मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 43 लोक अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बँकॉकमध्ये ही इमारत अजून बांधकामाधीन होती आणि अचानक झालेल्या भूकंपामुळे ती काही क्षणांत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली.Myanmar Earthquake News In Marathi

 

भूकंपामुळे म्यानमार आणि थायलंडमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. म्यानमारमध्ये एक तीन मजली इमारत कोसळत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. भूकंपाचे झटके जाणवल्यानं घाबरलेले लोक रस्त्यावर उतरले आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. बँकॉकमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली. त्यानंतर कामगार पळू लागले.

आतापर्यंत या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अधिकृतरीत्या समोर आलेले नाही, मात्र स्थानिक प्रशासन सतर्क असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. बँकॉकमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.Myanmar Earthquake News In Marathi

इतर महत्वाची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Leave a Comment