Navi Mumbai Mhada Lottery 2025 price म्हाडाच्या कोकण मंडळाने 5,362 एवढ्या सदनिका आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी (Housing Lottery) जाहीर केली आहे. या योजनेत नवी मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या घरांचा समावेश आहे. नवी मुंबईत असलेल्या सानपाडा, नेरुळ, दिघा, घणसोली आणि गोठेघर या भागांतील एकूण 293 घरं या लॉटरीमध्ये उपलब्ध आहेत. नवी मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल,
तर ही तुमच्यासाठी एक उत्तम आणि मोठी संधी आहे. कारण या घरांच्या किंमती फक्त 14 लाखांपासून सुरू होतात, त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी देखील ही योजना खिशाला परवडणारी आहे, असं म्हणता येईल. घरासाठी अर्ज करण्यापूर्वी त्याचे दर, क्षेत्रफळ आणि स्थानिक सोयीसुविधा याची माहिती घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया लोकेशन नुसार घरांच्या किमती.
Navi Mumbai Mhada Lottery 2025 price
नवी मुंबईत विक्रीसाठी उपलब्ध असलेली 293 घरं ही विविध योजनांमधून घेण्यात आली आहेत. यामध्ये म्हाडाच्या 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आणि कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचा समावेश आहे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोठी बातमी; लाडकी बहीण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार ! महिलांना 3000 रुपये “या” दिवशी मिळणार?
दिघा परिसरात फक्त 18.59 लाखांमध्ये घर
नवी मुंबईतील दिघा परिसरात बीकेएस गॅलेक्सी रिएल्टर्स एलएलपी या प्रकल्पात अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण 112 घरं उपलब्ध आहेत. या घरांची किंमत 18 लाख 59 हजार 600 एवढी असून, प्रत्येकीच क्षेत्रफळ 29.10 चौरस मीटर एवढं आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी इच्छुकांना 5,590 रुपये (अर्ज शुल्क व अनामत रक्कम मिळून) भरावे लागतील.
नेरुळमध्ये घर फक्त 23 लाखांपासून
नवी मुंबईच्या नेरुळ भागात पिरॅमिड डेव्हलपर्स या प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी 18 घरं उपलब्ध आहेत. या घरांची किंमत 23 लाख ते 30 लाख रुपये या दरम्यान आहे. प्रत्येक घराचं क्षेत्रफळ सुमारे 42.44 ते 54.59 चौरस मीटर एवढं आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना 10,590 (अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क मिळून) भरावे लागतील. मंडळी, नेरुळसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी घर मिळवायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.Navi Mumbai Mhada Lottery 2025 price
सानपाडा येथे 14 लाखात घर
नवी मुंबईतील सानपाडा येथील डीपीव्हीजी व्हेंचर्स एलएलपी या प्रकल्पात एकूण 19 घरं आहेत. ही घरं अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यासाठी आहेत.
(1) येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2 घरं आहेत.
त्यांची किंमत – 14 लाखांपासून सुरू
क्षेत्रफळ – 29.06 चौरस मीटर
अर्ज व अनामत रक्कम – ₹5,590
(2) तसेच सानपाडा येथे अल्प उत्पन्न गटासाठी 17 घरं आहेत. या घरांची किंमत – 18 लाख ते 24 लाख यादरम्यान आहे. क्षेत्रफळ – 37.17 ते 49.91 चौरस मीटर एवढे असून त्यासाठी अर्ज व अनामत रक्कम 10,590 रुपये एवढी आहे.
घनसोलीत 16 लाखात घर
नवी मुंबईतील घणसोली येथील निलकंठ इन्फ्राटेक या प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी 18 घरं उपलब्ध आहेत. येथील घरांची किंमत 16 लाख ते 25 लाख रुपये या दरम्यान आहे. तसेच या घरांचे क्षेत्रफळ 32.52 ते 48.19 चौरस मीटर एवढे आहे. यासाठी अर्ज आणि अनामत रक्कम मिळून 10,590 द्यावे लागणार आहे.Navi Mumbai Mhada Lottery 2025 price
हेही वाचा : क्लिक करा ⇒ म्हाडा लॉटरी; 9 लाखात घराचे स्वप्न पूर्ण होणार, “या” ठिकाणी सर्वाधिक 3641 घरे – जाणून घ्या किंमती व वेळापत्रक
सानपाडात 23 लाखात घर
नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी असलेल्या कामधेनु ग्रँड्युअर या प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी 17 घरं उपलब्ध आहेत. येथील घरांचे क्षेत्रफळ 42.32 ते 49.92 चौरस मीटर असून त्यांची किंमत 23 लाख ते 28 लाख रुपये यादरम्यान आहे. तसेच या घरांसाठी अर्ज व अनामत रक्कम 10,590 एवढी आहे.
घनसोली येथे 23 लाखात घर
नवी मुंबईतील घणसोली येथील निलकंठ इन्फ्राटेक या प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी 21 घरं उपलब्ध आहेत. महत्त्वाचं म्हणजे या घरांची किंमत 23 ते 28 लाख यादरम्यान असून त्यांचे क्षेत्रफळ 36.32 ते 46.22 चौरस मीटर एवढे आहे. आणि अर्ज आणि अनामत रक्कम मिळून 10,590 रुपये तुम्हाला भरावे लागणार.
गोठेघर येथे 36 लाखात घर
नवी मुंबईतील गोठेघर येथे अल्प उत्पन्न गटासाठी 88 घरं उपलब्ध आहेत. येथील घरांची किंमत 36 लाख ते 37 लाख रुपये या दरम्यान असून यांचे क्षेत्रफळ 47.85 चौरस मीटर असे आहे. अर्ज आणि अनामत रक्कम मिळून हा खर्च 10,590 रुपये एवढा आहे. या भागात आपलं स्वतःचं हक्काचं घर हवं असणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
Navi Mumbai Mhada Lottery 2025 registration
म्हाडाच्या या घरांसाठी 15 जुलै रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठीची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट आहे. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.Navi Mumbai Mhada Lottery 2025 price
म्हाडा लॉटरी PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
घरांच्या नोंदणी लिंक | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |