New Aadhaar App Launch यूआयडीएआयकडून जारी करण्यात आलेलं आधार कार्ड आता महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.आधार कार्डचा वापर करणं सोपं व्हावं आणि आधार कार्डचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आधार कार्ड संदर्भात नवं फीचर लाँच करणयात आलं आहे. हे आधारच्या डिजिटलायझेशनं संदर्भातील महत्त्वाचं पाऊल आहे. केंद्रीय मंत्री माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील माहिती दिली. फेस आयडी ऑथेटिकेशन फीचरसह यूआयडीएआयनं अॅप लाँच केलं आहे.
New Aadhaar App Launch
डिजिटल सुविधा आणि गोपनीयतेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने एक नवीन आधार अँप (New Aadhaar App Launch) लाँच केले आहे. हे अँप वापरकर्त्यांना त्यांचे आधार तपशील डिजिटल पद्धतीने पडताळणी आणि शेअर करण्याची परवानगी देईल. यामुळे आता प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड सोबत बाळगण्याची किंवा त्याची प्रत जमा करण्याची गरज राहणार नाही. या अॅपद्वारे नागरिकांना आधार अपडेट, कार्ड डाउनलोड आणि स्टेटस तपासणी अशा आधारशी संबंधित सर्व सेवा ऑनलाइन वापरता येणार आहे.
फेस आयडी ऑथेंटिकेशन फीचर :
या अॅपचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे फेस आयडी ऑथेंटिकेशन. हे फीचर तुमच्या आधारची सुरक्षा वाढवते आणि पडताळणी सुलभ करते. आधार पडताळणी आता तुम्ही QR कोड स्कॅन करून करू शकता. हॉटेलच्या रिसेप्शनवर, दुकानात किंवा प्रवासादरम्यान आधारची छायाप्रत सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.
सहज अपडेट करू शकता तपशील :
या अँपमुळे आधारच्या तपशीलांमध्ये छेडछाड, संपादन किंवा गैरवापर करता येणार नाही. हे अॅप यूजर फ्रेन्डली बनवले आहे, जेणेकरून कोणीही ते सहजपणे वापरू शकेल. आता तुम्ही अॅपद्वारे तुमच्या आधार कार्डवरील पत्ता आणि इतर तपशील सहजपणे अपडेट करू शकता. याशिवाय यात अनेक सुविधा उपलब्ध असतील
new aadhaar app launch in marathi
क्यूआर कोड पडताळणी फीचर :
फेस आयडी-आधारित प्रमाणीकरणाव्यतिरिक्त नवीन आधार अँप क्यूआर कोड पडताळणी फीचर देखील देईल. यामुळे आधार पडताळणी जलद आणि अधिक कार्यक्षम होईल. नवीन आधार अँप वापरून लोक फक्त QR कोड स्कॅन करू शकतात आणि चेहरा त्वरित पडताळला जातो. आता तुमचा आयडी फोटोकॉपीवरून नाही, तर थेट फोनवरून सुरक्षितपणे शेअर करू शकता. त्यामुळे तुम्हाला आता सोबत फोटोकॉपी वापरण्याची गरज भासणार नाही.
कोणते आहेत महत्त्वाचे फीचर्स?
युजर्स आता स्वत:च आवश्यक ती माहिती शेअर करू शकतात, जेणेकरून त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील. |
यूपीआय पेमेंटमध्ये जसा क्यूआर कोड स्कॅन केला जातो, त्याचप्रमाणे आधार व्हेरिफिकेशनही आता तितकंच सोपं होणार आहे. |
आता आधारची फोटोकॉपी किंवा स्कॅन करण्याची गरज भासणार नाही, सर्व काही अँप वरूनच केलं जाईल. |
मोबाइल अँप मध्ये चेहरा ओळखून लॉगिन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा आहे, ज्यामुळे सुरक्षा वाढते. |
हॉटेल, दुकानं किंवा ट्रॅव्हल चेकपोस्टवर आधारची प्रत देण्याची गरज भासणार नाही. |
ही प्रक्रिया १०० टक्के डिजिटल आहे आणि तुमची ओळख पूर्णपणे सुरक्षित असेल. |
या अँपमुळे आधार कार्डशी संबंधित डेटाचा गैरवापर किंवा लीक होण्याचा धोकाही कमी होईल. |
आधार माहितीशी छेडछाड किंवा कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. |
आधार व्हेरिफिकेशन अतिशय कमी वेळात आणि सोप्या पद्धतीनं केलं जाईल. |
युजर्सची प्रायव्हसी जुन्या पद्धतींपेक्षा अधिक मजबूत असेल.New Aadhaar App Launch |
इतर सरकारी योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |