Oneplus कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Oneplus Nord 4 लॉन्च केला आहे. पहिल्या Nord फोनपेक्षा खूप स्वस्त असा स्मार्टफोन आहे. कमी किंमतीत चांगले आणि जास्त फीचर्स या फोनमध्ये युजर्सना मिळणार आहे. काही मिनिटांमध्ये हा फोन फास्ट चार्जिंग होणार आहे असा Oneplus कंपनीने दावा केला आहे.
तुम्ही Oneplus कंपनीच्या मोबाईलचे चाहते असाल तर तुमच्यासाठी कंपनीने नवीन स्मार्टफोन Oneplus Nord 4 लॉन्च केला आहे दमदार बॅटरी आणि विविध फीचर्स कमी किंमती देण्यात आलेले आहे. सोशल मीडियावर खूप चर्चा या फोनची होत आहे. मिडरेंज स्मार्टफोन Oneplus Nord 4 Snapdragon 7 + Gen 3 प्रोसेसरसह बाजारात उपलब्ध झाला आहे. फोनमध्ये 5500 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. चला तर सर्व माहिती आपण जाणून घेऊया.
Oneplus Nord 4 माहिती
Oneplus च्या लॉन्चिंग प्रोग्राममध्ये अनेक डीवाईस या दरम्यान लॉन्च केले आहे. यामध्ये Oneplus Nord 4, Oneplus Buds 3 Pro, आणि Oneplus Watch 2R यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन तीन व्हिरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे त्यानुसार फोनच्या किंमतीत सुद्धा बद्दल होत आहे. फोनची प्री ऑर्डर 20 जुलै पासून ते 30 जुलै पर्यंत करता येइल. Oneplus चा नवीन फोन ई कॉमर्स साईट अमेझॉनवरून खरेदी करता येईल. 2 ऑगस्ट 2024 पासून फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. लॉन्च ऑफर अशी आहे की, ICICI बँक कार्डवर तुम्हाला डिस्काउंट देण्यात येईल.
Oneplus Nord 4 price
Oneplus कंपनीने नवीन फोन तीन व्हिरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. पहिला व्हिरिएंट 8GB + 128GB या फोनची किंमत 29,999/- रुपये आहे. दुसरा व्हिरिएंट 8GB + 256GB याची किंमत 32,999/- रुपये आहे. तिसरा व्हिरिएंट 12GB + 256GB स्टोरेज याची किंमत 35,999/- अशी आहे. या सर्व किंमती कंपनीने अधिकृत जाहीर केल्या आहेत. लॉन्चिंग ऑफर ICICI बँक कार्डवर अतिरिक्त 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ई कॉमर्स साईट अमेझॉन विक्रीसाठी 02 ऑगस्ट 2024 पासून उपलब्ध होणार आहे. 20 जुलै ते 30 जुलै पर्यंत तुम्ही प्री ऑर्डर करू शकता.
- 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज किंमत 29,999/- रुपये
- 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज किंमत 32,999/- रुपये
- 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज किंमत 32,999/- रुपये
Oneplus Nord 4 Specifications
फोनमध्ये Snapdragon 7 + Gen 3 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. 6.74 इंचचा OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे तसेच मागच्या साईटला ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे. फोनचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz आणि 2150 nits पिक ब्रायनट्स मिळतो. 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळतो. अँड्रॉइड 14 वर आधारित ऑस्क्सिजन ओएस आलेल्या या स्मार्टफोनला 4 वर्ष Android OS अपडेट मिळेल. फोटोग्रापीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50 मेगापिक्सचेल मेन कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5500 mAh बॅटरी देण्यात आली आहे तर 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
हे पण वाचा ⇓
Samsung Galaxy M35 5G | सर्वात पॉवरफुल बॅटरी आणि कॅमेरा जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत
Oneplus Nord 4 Display
Oneplus कंपनीने Oneplus Nord 4 फोनमधील डिस्प्ले ६.७४ इंचचा देण्यात आलेला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. सुपर एमोलेड डिस्प्लेसह येतो. OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. 2150 नीटस पिक ब्रायनट्स मिळतो.
Oneplus Nord 4 कॅमेरा
फोटोग्रापीसाठी Oneplus कंपनीने Oneplus Nord 4 फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल Sony LYTIA कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरामध्ये OIS आणि EIS सपोर्टसह येतो. सोबत 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. जो 112 डिग्री फिल्ड ऑफ View मिळतो. सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Oneplus Nord 4 प्रोसेसर
नवीन स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 + Gen 3 चिपसेट देण्यात आलेली आहे. जी कॉलकॉम अड्रिनो 732 GPU सपोर्टसह येते. फोनमध्ये रॅमचे दोन व्हिरिएंट आहे एक म्हणजे 8GB आणि दुसरे 12GB असे दोन रॅमचे व्हिरिएंट आहे. आणि 256GB पर्यंत फोनचा स्टोरेज देण्यात आला आहे.
Oneplus Nord 4 बॅटरी आणि चार्जिंग
Oneplus Nord 4 स्मार्टफोनमध्ये 5500 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे आणि 100 W Supervooc फास्ट चार्जर देण्यात आलेला आहे ज्यामुळे फोन काही मिनिटामध्ये फोन फुल चार्ज होतो. मोबाइलचे वजन 199 ग्रॅम इतके आहे.
Oneplus Nord 4 कनेक्टिव्हिटी
फोनमध्ये ड्युअल सिमकार्ड कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. फोनमध्ये Bluetooth ५.४ सपोर्ट देण्यात आलेला आहे. सोबतच NFS सपोर्ट देण्यात आलेला आहे. फोनच्या दोन्ही साईटला दोन स्पीकर देण्यात आलेले आहे.
Oneplus Nord 4 फोनची विक्री ई कॉमर्स साईट म्हणजे अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही अमॅझॉनवरून फोन ऑर्डर करू शकता.