Pan Card 2.0 Update Process In Marathi Online पॅन कार्ड हे ओळख व आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे. आता पॅन 2.0 हे नवीन स्वरूप सादर करण्यात आलं असून, ते आधीच्या कार्डपेक्षा अधिक सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे आयकर विभागाने हे नवे पॅन कार्ड OR कोडसह सादर केले आहे असून प्रमाणीकरण जलद होते आणि फसवणुकीची शक्यता कमी होते.
Pan Card 2.0 Update Process In Marathi Online
तुम्ही तुमचे जुने पॅन कार्ड नवीन पॅन 2.0 मध्ये अपग्रेड करण्याचा विचार करत आहात का? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ते अपग्रेड करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत. ई-पॅन मोफत मिळू शकतो, तर फिजिकल पॅन कार्डसाठी तुम्हाला नाममात्र शुल्क भरावे लागेल. या साईटवर जाऊन तुम्ही फक्त 9 स्टेप्स फॉलो करून नवीन पॅन कार्ड मिळवू शकता.
तुम्हाला तुमचे जुने पॅन कार्ड पॅन 2 .0 मध्ये अपग्रेड करायचे असेल, तर प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
ई-पॅन आणि फिजिकल पॅन मध्ये काय फरक आहे?
- ई-पॅन : हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असून ई-मेल वर मोफत मिळते.
- फिजिकल पॅन : पोस्टाद्वारे घरी पाठवले जाते. यासाठी रुपये 50 नाममात्र शुल्क भरावे लागते.
पॅन 2 .0 कोण देते ?
देशात दोन अधिकृत संस्था पॅन सेवा देतात :
- प्रोटिअन EGOV टेक्नॉलॉजि लिमिटेड (NSDL)
- UTI इन्फ्रास्टक्चर टेक्नॉलॉजि अँड सर्विसेस लिमिटेड (UTIITSL)
प्रोटिअन (NSDL) मार्फत पॅन 2 .0 कसे अपग्रेड कराल?
- प्रोटिअन NSDL वेबसाईट वर जा
- पॅन नंबर, आधार कार्ड नंबर, आणि जन्मतारीख टाका
- घोषणेला सहमती द्या आणि submit वर क्लिक करा.
- तुमचा तपशील पडताळा आणि OTP साठी मोबाइलवर किंवा ई-मेल वर निवडा.
- मिळालेला OTP टाका आणि सबमिट करा.
- पेमेंट पेजवर जाऊन रुपये 50 भरा.
- पेमेंट केल्यानंतर पावती मिळेल, ती सेव्ह करा.
- 24 तासानंतर ई-पॅन डाउनलोड करा.
- फिजिकल पॅन १५-२० दिवसात तुमच्या पत्त्यावर येईल.
केंद्र सरकारने पॅन सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पॅन 2.0 प्रकल्प सुरू केला आहे. नवीन पॅन अंतर्गत QR कोड जोडण्यात आला आहे, ज्याअंतर्गत तुम्ही स्कॅन करून सर्व माहिती मिळवू शकता.
QR कोड असलेल्या सिस्टीममुळे तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे करणे सोपे जाईल. (Pan Card 2.0 Update Process In Marathi Online) पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत सुमारे 1435 कोटी रुपये खर्च होण्याची सरकारची अपेक्षा आहे
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |