लाडक्या बहिणींना फक्त 550 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर, PM उज्ज्वला योजनेसाठी असा अर्ज करा ! PM Ujjwala Yojana in marathi

PM Ujjwala Yojana in marathi सध्या घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅसच्या किंमती 900 पार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना एवढा महागसा गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही. याच नागरिकांसाठी केंद्र सरकारने पीएम उज्जवला योजना (PM Ujjwala Yojana) सुरु केली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Ujjwala Yojana in marathi

PM उज्ज्वला योजनेत सरकार गरीब कुटुंबातील नागरिकांना 550 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देते. या योजनेत सरकार 14.2 किलोच्या तीन सिलिंडरसाठी सब्सिडी देते. सरकार एकूण 1600 रुपये थेट महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करते. ग्रामीण भागातील अनेक लोक आजही चुलीवर जेवण बनवतात. यापासून सुटका होण्यासाठी गॅस सिलिंडर कमी किंमतीत दिले जात आहे. 

उज्जवला योजनेचा दुसरा व्हर्जनदेखील लाँच करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना गॅस सिलिंडरवर सब्सिडी मिळते.केंद्र सरकारने 2016 रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना आणि ग्रामीण भागातील कुटुंबियांना एलपीजी गॅस दिले जातात.

PM Ujjwala Yojana

पीएम उज्जवला योजनेसाठी पात्रता :

  • महिला ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
  • महिलांचे वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • अनुसूचित जाती किंवा जमातीतील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यांनी पीएम आवास योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पीएम उज्जवला योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड,
  • रहिवासी प्रमाणपत्र,
  • पासपोर्ट साइज फोटो,
  • रेशन कार्ड,
  • जातीचे प्रमाणपत्र,
  • केवायसी, बँक अकाउंट नंबर,
  • बीपीएल प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला https://pmuy.gov.in/hi/ujjwala2.html या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर अप्लाय फॉर उज्वला कनेक्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्ही गॅस एजन्सीचे नाव निवडायचे आहे. यानंतर Indane, Bharat Gas किंवा HP Gas पैकी ऑप्शन निवडायचा आहे.यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे.

यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट घेऊन गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे. येथे तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

महिलांना पाठबळ देण्यासाठी सरकारनं मोफत गॅस योजना सुरु केली आहे. मोठ्या प्रमाणात इंधनावर पैसा खर्च होतो. त्यामुळं सरकारनं मोफत गॅस देण्याची योजना सुरु केली. सरकारनं आत्तापर्यंत 10 कोटीहून अधिक महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिली आहेत. महिलांना स्वयंपाक करताना त्रास होऊ नये, धुराचा सामना करावा लागू नये म्हणून हा यजना सुरु करण्यात आलीय.

तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यासाठी https://www.pmuy.gov.in/ या बेवसाईटवर जाऊन सविस्तर माहिती घ्या.(PM Ujjwala Yojana)

इतर सरकारी योजनांची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||(PM Ujjwala Yojana)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment