PMRDA सदनिकांसाठी निवड यादी जाहीर, एकदम किंवा टप्याटप्याने भरा रक्कम, या तारखेपर्यंत मुदत | PMRDA Lottery Payment Process

PMRDA Lottery Payment Process पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या (PMRDA) सदनिकांची (फ्लॅट) सोडत बुधवारी मुंबई येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. सेक्टर क्रमांक 12 आणि वाल्हेकरवाडी सेक्टर क्रमांक 30 आणि 32 येथील गृहप्रकल्पासाठी हि यादी जाहीर करण्यात आली. 1 हजार 337 सदनिकांपैकी 1 हजार 15 सदनिकांची निवड यादी जाहीर केली आहे. या लेखात आपण रक्कम कशाप्रकारे आणि कशी भरायची आहे, रक्कम भरण्यासाठी किती मुदत देण्यात आलेली आहे हे पाहणार आहोत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMRDA Lottery Payment Process

सदर निवड यादीतील ज्या सदनिकाधारकांना सदनिका नाकारायची असेल, त्यासाठी त्यांना 25 फेबुवारी 2025 पर्यंत मुदत दिली जाणार आहे. 26 फेबुवारी 2025 तारखेपासून सदनिकासाठी सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम वगळता सदनिकाधारकडून अन्य 100 टक्के रक्कम भरून घेण्याची कार्यवाही सुरु होणार आहे.

ज्यांना हि रक्कम पूर्ण भरणे शक्य नसेल त्यांना पहिल्या 45 दिवसांमध्ये 25 टक्के तर पुढील 60 दिवसांमध्ये उर्वरित 75 टक्के रक्कम भरावी लागणार आहे त्यानंतर लाभार्थी नागरिकांना ताबा पावती दिली जाणार आहे, तसेच आरक्षित प्रवर्गातील नागरिकांना जात पडताळणी दाखविणे बंधनकारक आहे, अशी माहिती PMRDA चे सहआयुक्त यांनी दिली आहे. 

PMRDA Sector 12 Lottery

PMRDA या संकेत स्थळावर मुख्यमंत्रीच्या हस्ते ऑनलाईन सोडत आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे, तसेच अर्जदारांच्या लॉगिनवर आणि त्यांना मोबाईलवर SMS करून देखील हि माहिती कळविण्यात आली आहे. PMRDA सेक्टर 12 येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत EWS (1BHK ) प्रवर्गातील 47 सदनिकासाठी 47 जणांची निवड यादी काढण्यात आली तर LIG (2BHK ) प्रवर्गातील 614 सदनिकांसाठी 498 जणांची यादी निवड यादी जाहीर केली आहे.

तसेच सेक्टर क्रमांक ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (1RK ) प्रवर्गातील 347 सदनिकांसाठी फक्त 180 अर्ज आल्याने तेवढ्याच जणांची निवड यादी जाहीर केली आहे. येथील LIG (1 BHK ) प्रवर्गातील 329 सदनिकांसाठी 290 जणांची निवड यादी काढण्यात आली आहे. प्रावारनिहाय अर्ज कमी आल्याने एकूण 1 हजार 337 सदनिकांपैकी 1 हजार 15 सदनिकांसाठी निवड यादी जाहीर केली आहे. तर, एकूण 578 जणांची प्रतिष्ठा यादी देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. 

PMRDA Sector 12 Lottery Required Documents List

  • पासपोर्ट साइज फोटो 
  • स्वाक्षरी 
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • उत्त्पन्न दाखला 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • दिव्यांग दाखला (असल्यास)
PMRDA Sector 12 Lottery Winners PDF Download
PMRDA निवड यादी पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA 1337 फ्लॅटची सोडत आज जाहीर, अँप्लिकेशन नंबर टाकून चेक करा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ RTE प्रक्रिया आजपासून सुरु, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर | प्रवेशप्रक्रिया “या” तारखेपर्यंत

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment