Ration Card Mera ekyc In Marathi महाराष्ट्र शासन व NIC यांच्या सहकार्याने Mera E-Kyc अँप सूर करण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या Ekyc करता येणार आहे. राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांना ई-केवायसी बंधनकारक केलीये. आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी करण्यात येत होती. परंतु, ही केवायसी करताना अनेक अडचणी येत होत्या.
Ration Card Mera ekyc In Marathi
आता शासनाने रेशनकार्डधारकांसाठी खूशखबर दिली असून ई-केवायसीची मुदत ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवली आहे. तसेच आता लाभार्थ्यांना रेशन दुकानात जाण्याची गरज नाही. तर घरी बसूनच आपल्या मोबाईलवरून ई-केवायसी करता येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने ‘मेरा ई-केवायसी’ मोबाईल ॲप कार्यरत केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही रास्त भाव धान्य दुकानात न जाता घरबसल्या स्वत:च्या व आपल्या शिधा पत्रिकेतील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे.
मुख्य वैशिष्ट्ये :
- घरबसल्या सोप्या पद्धतीने ekyc करा.
- फेस Authentication तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी
- रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य Ekyc करू शकतो.
- आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक
Ration Card Mera ekyc
ई- केवायसी कशी करावी ?
(Step By Step)
१. आवश्यक अँप अपलोड करा :
Play स्टोअर mera E -KYC App व Aadhaar Face RD Service App डाउनलोड करा.
२. अँप इन्स्टॉल करून सेटअप करा :
दोन्ही अँप इन्स्टॉल करा आणि आवश्यक परवानगी द्या.
३. Mera E -KYC App अँप उघडा :
*राज्य महाराष्ट्र निवडा
*आधारक्रमांक टाका व मोबाइल वर आलेला OTP प्रविष्ट करा.
*कॅप्टचा कोड टाका (स्क्रीनवरील सूचनेनुसार)
४. चेहऱ्याद्वारे पडताळणी : (Face Authentication)
*स्वतःसाठी समोरचा कॅमेरा वापर किंवा दुसऱ्या व्यक्तीची Kyc करत असाल तर बॅक कॅमेरा वापरा.
*स्क्रीनवरील सूचनांनुसार डोळ्यांची उघड झाप करा.
५. सत्यापन पूर्ण :
*यशस्वी पडताळणी झाल्यावर लाभार्य्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई पोस मशीनवर दिसेल.
* Ekyc स्टेट्स मध्ये Y दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण. Ration Card Mera ekyc In Marathi
अत्यंत महत्वाचे :
- ही सेवा फक्त महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी आहे.
- महाराष्ट्र बाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी E – Pos मशीनवर IMPDS KYC पर्याय वापरा.
- E Kyc न केल्यास अन्न धान्याचा लाभ बंद होऊ शकतो.
इतर सरकारी योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Ration Card Mera ekyc In Marathi