PCMC ; रावेतमधील आवास योजनेतील लाभार्थ्यांना किवळेमध्ये फ्लॅट मिळणार ; समंतीपत्र आणि कागदपत्र देण्याचे आवाहन | Ravet Pradhan Mantri Awas Yojana

Ravet Pradhan Mantri Awas Yojana आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किवळे येथे 0755 सदनिका (फ्लॅट) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे प्राप्त होणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत रावेत प्रकल्पातील 0934 सदनिकांकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत संगणकीय सोडत काढण्यात आलेली होती. सद्य सिस्थित मा. महापालिका प्रशासक ठराव क्रमांक. ८१९, दि. ०७/०१/२०२५ अन्वयाये रावेत येथील प्रकल्प रद्द करण्यास मान्यता मिळेलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ravet Pradhan Mantri Awas Yojana

तथापि, रावेत प्रकल्पातील विजेता यादीमधील निवड झालेल्या अर्जदारांना महानगरपालिकेकडे उपलब्ध होणाऱ्या किवळे येथील आर्थिकदृष्टया दुर्ब्रल घटकांसाठी प्रकप्लातील 0755 सदनिकांचे हस्तांरण करण्यात येणार आहे. किवळे येथील सदनिकेची (फ्लॅट) किमंत १३,००,७१८/- इतकी निश्चित करण्यात आली आहे. रावेत प्रकल्पातील ज्या लाभार्थ्यांना सदर किमतीत लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी तसे समंतीपत्र दिल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान धोरणानुसार 0755 सदनिका वितरित करण्यात येतील. त्याचा तपशील खाली देण्यात आला आहे.

Ravet Pradhan Mantri Awas Yojana Details 

प्रकल्पाचे नाव  प्रवर्ग  सर्वसाधारण  इतर मागासवर्गीय  अनुसूचित जाती  अनुसूचित जमाती  एकूण 
359 215 93 50 717
किवळे  दिव्यांग  19 11 05 03 38
एकूण  378 226 98 53 755

 

तरी रावेत प्रकल्पातील फक्त विजेता यादीमधील निवड झालेल्या अर्जदारांना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वर्सन विभागाकडे समंतीपत्र सादर करावे. सदरच्या समंतीपत्र मसुदा फक्त विजेता यादीमधील अर्जदाराने Whatsapp द्वारे (अर्ज करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर) व झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, चाफेकर चौक, चिंचवडगाव येथील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अर्जदारांनी खालील नमूद आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी पत्ता : झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, चाफेकर चौक, चिंचवडगाव येथे दिनांक १५/०३/२०२५ पर्यंत मुदत देण्यात येत आहे. तरी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० पर्यंत खालील कागदपत्रांची 1 झेरॉक्स सादर करणे आवश्यक आहे. 

Ravet Pradhan Mantri Awas Yojana Required Documents

अ. क्र.  कागदपत्रे 
1 उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ३ लाख) 
2 जात प्रमाणपत्र 
3 जात वैधता प्रमाणपत्र (फक्त अर्जदाराचे उपलब्ध असल्यास)
4 आधार कार्ड 
5 पॅनकार्ड 
6 बँक पासबुक (अर्जदार)
7 मतदान ओळखपत्र 
8 भाडेकरार (भाड्याने राहत असल्यास)
9 वीज बिल 
10 अधिवास प्रमाणपत्र 
11 दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) Ravet Pradhan Mantri Awas Yojana

 

किवळे प्रकल्पातील सदनिकांकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निकष पूर्तता (उदा. संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, समंतीपत्र इ.) करणाऱ्या अर्जदारांनाच सदनिका वाटप करण्यात येईल. सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी शर्तीमध्ये बदल करण्याचे व सदनिका हसतारण बाबतच्या प्रक्रियेचे सर्व अधिकार आयुक्त. पिंपरी चिंचवड महानगरपालिका याना आहेत. 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA 1337 फ्लॅटची सोडत आज जाहीर, अँप्लिकेशन नंबर टाकून चेक करा.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ 10 लाख ते 1 कोटी पर्यंत सरकारी कर्ज योजना केंद्र सरकारची नवी योजना संपूर्ण माहिती पहा 

Ravet Pradhan Mantri Awas Yojana
Ravet Pradhan Mantri Awas Yojana
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

तसेच नागरिकांनी कुठल्याही एजंट बळी पडू नये. तसेच कोणी करत असल्यास किंवा सदनिका (फ्लॅट) मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी करत असल्यास, याची माहिती झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या कार्यालयातील अधिकाऱ्यांना कळवावी. अशा व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. Ravet Pradhan Mantri Awas Yojana

Leave a Comment