Redmi 13 5G : रेडमी नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. ज्यात 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5030 mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. अजून काय काय फीचर्स आहेत किंमत काय आहे सर्व माहिती रेडमी कंपनीने जाहीर केली आहे.
रेडमी कंपनीचा नवीन स्मार्टफोन Redmi 13 5G 09 जुलै 2024 रोजी लॉन्च झाला आहे. कमी किंमतीत जास्त फीचर्स असणारा हा नवीन फोन आहे. रेडमीचा 10 वर्ष कंप्लिट झाल्यामुळे रेडमी सिरीज नवीन फोन भारतात लॉन्च करून धुमाकूळ घालून दिला आहे. Redmi 13 5G नवीन स्मार्ट फोन कॉलकम Snapdragon 4 Gen 2 AE चिपसेट सोबत येत आहे. रेडमी 13 5G फोनचा रियर कॅमेरा 108 मेगापिक्सेल आहे आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. आणि फोनच्या बॅटरी बद्दल बोलायचं झाला तर 5030 mAh ची दमदार बॅटरी दिली आहे आणि सोबत 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. चला तर मग आपण या नवीन फोनची संपूर्ण माहिती म्हणजे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन पाहूया.
Redmi 13 5G माहिती
Redmi 13 5G नवीन फोन भारताच्या बाजारात आज आणला आहे आणि सर्वत्र या फोनची चर्चा चालू झाली आहे. रेडमी कंपनीने ब्लॅक डायमंन, हावयायन ब्लू आणि मनूस्टोन सिल्वर कलर असे ऑप्शन देण्यात आलेले आहे. रेडमीने दोन व्हॅरिएंटमध्ये हा फोन लॉन्च केला आहे. एक मॉडेल 6GB रॅम व 128GB आहे आणि दुसरा मॉडेल 8GB रॅम व 128GB स्टोरेज असे दोन मॉडेल केले आहे. दोन्ही मॉडेलच्या किंमती हि जाहीर झाल्या आहे. Redmi 13 5G फोन 12 जुलै 2024 पासून अमेझॉन, शाओमी रिटेल, आणि mi.com ऑनलाईनवरून तुम्ही खरेदी करता येईल.
फोनची सर्वात मोठी खासियत काय असेल तर ती, फोनच्या प्रायमरी कॅमेरा जो 108 मेगापिक्सेल देण्यात आलेला आहे आणि दुसरी मोठी खासियत फोनची बॅटरी 5030 mAh एवढी दमदार देण्यात आलेली आहे.
Redmi 13 5G Price
6GB रॅम व 128GB स्टोरेज या व्हिरिएंटची किंमत 13,999/- रुपये अशी आहे आणि दुसऱ्या व्हिरिएंटची 8GB व 128GB मॉडेलची किंमत 15,499/- रुपये इतकी आहे. Redmi 13 5G फोन 12 जुलै 2024 पासून अमेझॉन, शाओमी रिटेल, आणि mi.com ऑनलाईनवरून तुम्ही खरेदी करता येईल. लॉन्च ऑफर पण देण्यात आलेली आहे ती ऑफर अशी आहे की, यूजर्स एक हजाराचा बँक डिस्काउंट मिळू शकतो आणि फोनसाठी EMI ऑप्शन देखील मिळवू शकतात.
मॉडेल | किंमत |
6GB रॅम व 128GB स्टोरेज | 13,999/- |
8GB रॅम व 128GB स्टोरेज | 15,499/- |
हे पण वाचा ⇓
Redmi Note 13 Pro | भारतातील पहिला 200 MP कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च संपूर्ण फीचर्स, किंमत स्पेसिफिकेशन माहिती
Redmi 13 5G Specification
- रेडमी 13 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 14 बेस शाओमीचा HyperOS वर चालतो.
- फोनचा डिस्प्ले 6.69 इंच फुल HD + (1080X2400 पिक्सेल) IPS LCD डिस्प्ले दिला आहे.
- फोन स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे आणि प्रोटेकेशनसाठी गोरिला ग्लास 3 दिला आहे.
- त्याचबरोबर ऐड्रोनो 613 GPU देखील मिळतो.
- इंटर्नल स्टोरेज SD कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यन्त वाढवता येतो.
- 3.55 mm चा Audio जॅक आणि बॉटॉम फायरिंग लॉडस्पीकर फोनमध्ये देण्यात आला आहे.
- USB C type चार्जर आहे.
- Snapdragon 4 Gen 2 AE चिपसेट सोबत येत आहे.
- रिजोल्यूशन 1080X2400 पिक्सेल आहे.
- स्क्रीन टू बॉडी रेशयो 91 % आणि पिक ब्रायनट्स 550 नीटस आहे.
- साईट माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
Model | Redmi 13 5G |
Display Size | 6.79 inches, 109.5 cm2 |
OS | Android 14, Hyper OS |
Memory | 6GB RAM 128GB & 8GB RAM 128GB |
Main Camera | 108 MP, 8 MP & 2 MP |
Front Camera | 13 MP |
Battery | 5030 mAh, 33W Charger |
USB | USB Type-C |
Redmi 13 5G कॅमेरा
रेडमी 13 5G फोनमध्ये Samsung ISOCELL HM6 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा दिला आहे. जो 3x इन सेन्सर झूम सोबत येत आहे. आणि 8 मेगापिक्सेल वाईड अँगल सेन्सर कॅमेरा आहे. यासोबत 2 मेगापिक्सेल मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये एक पंचहोल कॅमेरा कटआऊट दिला आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
रेडमी 13 5G फोनमध्ये 5030 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. USB Type C चार्जर सोबत येत आहे. सोबत 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनचे वजन 205 ग्रॅम आहे. फोनमध्ये एआर ब्लास्टर (IR) सपोर्ट दिला आहे.
FAQ’s
प्रश्न : Redmi 13 5G कधी लॉन्च झाला?
उत्तर : 09 जुलै 2024
प्रश्न : फोनमध्ये रॅम आणि स्टोरेज किती आहे?
उत्तर : 6GB रॅम व 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम व 128GB स्टोरेज
प्रश्न : रेडमी 13 5G कॅमेरा किती आहे?
उत्तर : 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल वाईड अँगल सेन्सर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो सेन्सर कॅमेरा
प्रश्न : फोनमध्ये बॅटरी किती आहे?
उत्तर : 5030 mAh देण्यात आली आहे.
प्रश्न : Redmi 13 5G किंमत किती आहे?
उत्तर : 6GB रॅम व 128GB स्टोरेज किंमत 13,999/- आणि 8GB रॅम व 128GB स्टोरेज किंमत 15,499/-