Redmi A5 price In Marathi शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीने आज भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन म्हणजे Redmi A5. हा स्मार्टफोन किफायतशीर बजेटमध्ये येणारा, भरपूर फीचर्ससह सुसज्ज असा आहे. Redmi 5A Price in India: Xiaomi ने भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi A5 लाँच केला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे ज्याची किंमत 6,499 रुपयांपासून सुरू होते. कमी किंमत असूनही, कंपनीने त्यात अनेक उत्तम फीचर्स दिली आहेत.
Redmi A5 price In Marathi
या फोनची खासियत म्हणजे यामध्ये मिळणारी सर्वात मोठी 6.8 इंचांची डिस्प्ले आणि 120Hz ची स्मूथ रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. Redmi A5 मध्ये अख्खा दिवस चालणारी 5200mAh क्षमतेची बॅटरी आणि पॉवरफुल ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची किंमत फक्त 6500 रुपयांपेक्षाही कमी आहे. चला, सविस्तर जाणून घेऊया Redmi A5 विषयी सर्व काही.
भारतात Redmi A5 ची किंमत
Redmi A5 (Redmi A5 price In Marathi) च्या 3GB RAM + 64GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची भारतात किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,499 रुपये आहे. हा फोन जैसलमेर गोल्ड, जस्ट ब्लॅक आणि पांडिचेरी ब्लू अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन उद्या, 16 एप्रिलपासून दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart आणि Xiaomi India च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल.Redmi A5 price In Marathi
Redmi A5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेली 6.88 इंचाची HD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये नॉचच्या आत 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Unisoc T7250 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो, ज्यामध्ये 4GB पर्यंत RAM आणि 4GB पर्यंत व्हर्च्युअल RAM आहे. यासोबतच एकूण 12GB पर्यंत विस्तारणीय RAM चा सपोर्टही मिळतो.
कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, Redmi A5 मध्ये 32MP चा रिअर कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्लॅट फ्रेमसह स्लिक डिझाईन असून, नव्या मेटॅलिक-फील सराउंडसह एक अपग्रेडेड कॅमेरा डेको देखील आहे. हा फोन Android 15 वर चालतो आणि याला 2 Android मेजर अपडेट्स तसेच 4 वर्षांपर्यंत सिक्योरिटी पॅच अपडेट्स मिळणार आहेत.
Redmi A5 मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि 15W चार्जिंग सपोर्टसह 5200mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅकचा समावेश आहे. यात AI-समर्थित फेस अनलॉक फीचरचा देखील सपोर्ट आहे.

इतर स्मार्टफोनची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
अश्याच नवनवीन स्मार्टफोन आणि इतर माहितीसाठी आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला नक्की जॉईन करा आणि सदरील माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा | धन्यवाद || Redmi A5 price In Marathi