Royal Enfield कंपनीने बाईक प्रेमींसाठी नवीन रोडस्टर बाईक Royal Enfield Guerrilla 450 17 जुलै 2024 रोजी लॉन्च करून धमाका केला आहे. आता पर्यन्तची सर्वात पॉवरफुल रोडस्टर बाईक Royal Enfield कंपनीने लॉन्च केली असून ही पॉवरफुल राईड असेल असा कंपनीचा दावा आहे.
Royal Enfield Guerrilla 450 : भारतीय बाजारात सर्वात जास्त बाईक प्रेमी आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून ऑटो कंपन्या आणि विविध बाईक उत्पादक ब्रँड कंपन्या याच बाईक प्रेमींना केंद्र स्थानी ठेवून नवनवीन बाईक बाजारात घेऊन येत आहे त्यातच Royal Enfield कंपनीने 17 जुलै 2024 रोजी त्यांची नवीन बाईक Royal Enfield Guerrilla 450 लॉन्च करून पूर्ण मार्केटमध्ये धमाका केला आहे. Guerrilla 450 असे नव्या बाईकचे नाव असून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. चला तर मग या नवीन बाईक विषयी संपूर्ण माहिती आपण पाहूया.
Royal Enfield Guerrilla 450 माहिती
नवीन Guerrilla 450 जबरदस्त अशी आधुनिक बाईक आहे. एकदम फर्स्ट क्लास लुक जे बाईक प्रेमींची नजर रोखून धरणार आहे आणि बाईकचे दमदार पॉवरफुल इंजिन या सर्व गोष्टींमुळे ही बाईक भारतातील रस्त्यावर जबरदस्त अशी कामगिरी करेल असा कंपनीचा दावा आहे. 01 ऑगस्ट 2024 पासून बाईक सर्वत्र उपलब्ध होणार असून बुकिंग सुद्धा चालू होणार आहे यात कंपनीने बाईकची किंमत पण जाहीर केल्या आहेत. या बाईकचे इंजिन 40 हॉर्स पॉवर देते. बाईकची किंमत ही तीन व्हिरिएंट नुसार जाहीर केल्या असून बाईकची किंमत 2.39 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी किंमत मोजावी लागणार आहे. तीन व्हिरिएंट नुसार किमतीत बद्दल होणार आहे.
Royal Enfield Guerrilla 450 किंमत | Royal Enfield Guerrilla 450 price
01 ऑगस्ट 2024 पासून Guerrilla 450 बाईक विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ही बाईक तीन व्हिरिएंटमध्ये लॉन्च झाली आहे. 1. अनालॉग 2. डॅश आणि 3. फ्लॅश असे तीन व्हिरिएंट आहे. महत्वाचा प्रश्न म्हणजे बाईकची किंमत 2.39 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी किंमत आहे. व्हिरिएंट नुसार किंमतीत बद्दल होणार आहे ते पुढीलप्रमाणे
मॉडेल | किंमत |
Analogue Model | 2,39,000/- |
Dash Model | 2,49,000/- |
Flash Model | 2,54,000/- |
Royal Enfield कंपनीने या बाईकसाठीची अधिकृत बुकिंग प्रकिया सुरु केली असून तुम्ही कंपनीचे अधिकृत वेब साईटवरून किंवा Royal Enfield कंपनीच्या अधिकृत डीलरकडून बाईकची बुकिंग करू शकता त्यानुसार बाईकची डिलिव्हरी ही 01 ऑगस्ट 2024 पासून केली जाणार आहे.
हे पण वाचा⇓
Bajaj Freedom 125 CNG Bike | जगातील पहिली Super CNG Bike लॉन्च जाणून घ्या संपूर्ण माहिती
Tata Punch EV : टाटाची जबरदस्त EV 1 नंबर कार | जाणून घ्या सर्व फीचर्स आणि संपूर्ण माहिती
Royal Enfield Guerrilla 450 कलर
450 सीसी Royal Enfield कंपनीची ही दुसरी बाईक असून ती पाच कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणून तुम्हाला Royal Enfield Guerrilla 450 बाइकमध्ये पाच ऑप्शन मिळून जातील ते कलर ऑप्शन पुढीलप्रमाणे
- Smoke Silver
- Playa Black
- Yellow Ribbon
- Gold Dip
- Brava Blue
Royal Enfield Guerrilla 450 features
- Guerrilla 450 बाईकचे वजन 185 किलो इतके आहे.
- Guerrilla 450 ही कंपनीची 450cc इंजिन असेलेली Royal Enfield दुसरी बाईक आहे.
- नवीन बाईक Guerrilla 450 चे डिझाईन रोडस्टर स्टाईलचे असून जबरदस्त आधुनिक बाईक आहे. अश्या डिझाईनचा वापर राईडसना आकर्षित करते.
- हिमालयन बाईक पेक्षा या बाईकचे वजन 11 किलो इतकी हलकी आहे.
- Guerrilla 450 बाईकचे ट्यूबलेस टायर 17 इंच आहे जे रस्त्यावर चांगल्या प्रकारे काम करते.
- बाईकची हेडलाईट गोल एलईडी आहे अशी डिझाईन बाईकला क्लासिक फील देण्यास मदत करते.
- बाईक 6 गिअरबॉक्सने जोडण्यात आलेल्या अश्या बाइकमध्ये असिस्ट आणि स्लिप क्लच देण्यात आलेला आहे.
- 11 लिटरच्या फ्युएल टॅंक देण्यात आलेला आहे.
- बाइकमध्ये एक गोल TFT डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेला आहे ज्यात अनेक फीचर्स आहेत.
- बाईकला 4 इंचाचा इंफोटेंमेंट डॅश कल्स्टर दिला असून त्यात GPX फॉरमॅट मधील रूट रेकॉर्डिंग, म्युझिक कंट्रोल आणि हवामानाचा अंदाज अशी माहिती मिळते.
- बाइकमध्ये ड्युएल चॅनल अँटी लॉक ब्रेकइंग सिस्टिम आहे.
- बाईकच्या पुढच्या टायरमध्ये 310mm हायड्रॉलिक डिस्क ब्रेकची सुविधा आहे आणि तसेच मागच्या बाजूस 270mm व्हँटीलेटेड डिस्क ब्रेकची सुविधा आहे. अचानक ब्रेक दाबल्यास बाईक स्लिप किंवा घासणार नाही.
- बाइकमध्ये 40PS आणि 40 NM ट्रॉक जनरेट होते त्यात वॉटर कॉल्ड सिस्टिम देण्यात आलेली आहे.
- दोन्ही बाईकच्या चाकामध्ये 43 MM टेलिस्पोकिप फ्रंट फ्रोर्क आणि लिंकेज टाईप मोनोशोक स्पेशन दिले आहे यामुळे रायडरला आराम मिळतो.
कोणत्याही भागातील कोणतेही रस्ते असू देत Royal Enfield ची नवीन बाईक Royal Enfield Guerrilla 450 रायडींगचा पुरेपूर आनंद देईल कोणतेही अडचणी येणार नाही आणि रायडर्स बाईक चालवताना निराशा होणार नाही असा कंपनीचा दावा आहे.
FAQ’s
प्रश्न : Royal Enfield Guerrilla 450 किंमत किती आहे?
उत्तर : 2,39,000/- रुपये
प्रश्न : बाईक कधी पासून बुक करू शकतो?
उत्तर : 17 जुलै 2024
प्रश्न : बाईकमध्ये किती कलर आहे?
उत्तर : बाईकमध्ये पाच कलर आहे. Smoke Silver, Playa Black, Yellow Ribbon, Gold Dip आणि Brava Blue