Samsung Galaxy a56 In Marathi Samsung ने आपला अफोर्डेबल प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy A56 5G सादर केला आहे. टेक जगतात बराच काळ चर्चेत राहिल्यानंतर अखेर या मोबाईलने मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. स्टायलिश डिझाइन आणि दमदार स्पेसिफिकेशन्ससह गॅलेक्सी A56 5G हा फोन 12GB RAM आणि Exynos 1580 प्रोसेसर वर काम करतो. या नवीन Samsung 5G फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती पुढे दिली आहे.
Samsung Galaxy a56 In Marathi
तुम्ही चांगल्या कंपनीचा, दमदार लुक असलेला आणि कमी किमतीत असा नवीन स्मार्टफोन शोधात आहे? मग हि बातमी तुमच्यासाठी आहे. Samsung आपला अफोर्डेबल प्रीमियम स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी A56 5G बाजारात आणला आहे. नवीन फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सॅमसंगने एक चांगला पर्याय आणला आहे. सॅमसंग गॅलेक्सी A56 5G या फोनमध्ये तुम्हाला स्टायलिश डिझाइन आणि दमदार स्पेसिफिकेशन्स मिळू शकतील. या स्मार्टफोनमध्ये 12जीबी रॅम आणि Exynos 1580 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Samsung Galaxy a56 In Marathi या लेखात नवीन सॅमसंग 5जी फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जेणेकरुन तुम्हाला फोन घ्यायचा की नाही ते ठरवता येईल.
Samsung Galaxy a56 5G
नवीन सॅमसंग गॅलेक्सी A56 5G फोन लुकच्या बाबतीत ब्रँडच्या प्रीमियम Galaxy S25 प्रमाणेच दिसतो. यात मेटल बॉडी वापरण्यात आली आहे आणि फ्रंट व बॅक पॅनेलला Gorilla Glass Victus+ ची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच, IP67 सर्टिफिकेशन असलेल्या या फोनला पाण्यापासून सुरक्षित ठेवता येते. गॅलेक्सी A56 5G च्या डायमेंशन्स 162.2 x 77.5 x 7.4 मिमी आहेत आणि याचे वजन 198 ग्रॅम आहे. हा 5G स्मार्टफोन तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – Awesome Graphite, Awesome Olive आणि Awesome Lightgray.
Samsung Galaxy a56 Specification
डिस्प्ले : Samsung Galaxy A56 5G मध्ये 6.7-इंच FHD+ (1080 x 2340 पिक्सल) Infinity-O HDR डिस्प्ले देण्यात आला आहे. ही Super AMOLED स्क्रीन असून 120Hz रिफ्रेश रेट आणि 1900 nits पीक ब्राइटनेस प्रदान करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनच्या स्क्रीनचे संरक्षण Gorilla Glass Victus+ ने करण्यात आले आहे. |
प्रोसेसर : नवीन स्मार्टफोन Android 15 वर कार्यरत असून One UI 7 वर आधारित आहे. प्रोसेसिंगसाठी यामध्ये 4nm Exynos 1580 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 2.9GHz क्लॉक स्पीड पर्यंत कार्य करू शकतो. ग्राफिक्ससाठी हा फोन AMD Xclipse 540 GPU ला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे, 6 वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्स आणि 6 जनरेशन OS अपडेट्स सुद्धा मिळणार आहेत |
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A56 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या 50MP OIS प्रायमरी सेन्सर (f/1.8 अपर्चर) सह 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स (f/2.2 अपर्चर) आणि 5MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP फ्रंट कॅमेरा (f/2.2 अपर्चर) देण्यात आला आहे. |
बॅटरी : Samsung Galaxy A56 5G मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी फुल चार्जवर 29 तासांपर्यंत चालू शकते. तसेच, 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी चा सपोर्ट आहे, ज्यामुळे बॅटरी लवकर चार्ज होते. |
इतर फीचर्स : फोनमध्ये Eye Care स्क्रीन आहे, जी डोळ्यांचे संरक्षण करते. कनेक्टिव्हिटीसाठी 5GHz Wi-Fi, Bluetooth 5.3 आणि NFC सारखे फीचर्स दिले आहेत. यात 3.5mm हेडफोन जॅक नाही, परंतु USB Type-C ऑडिओ आणि स्टेरिओ स्पीकर्स सपोर्ट करतात. |
कलर : Awesome Graphite, Awesome Olive आणि Awesome Lightgray |
किंमत : मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy A56 चार उत्कृष्ट रंगांमध्ये उपलब्ध आहे: ग्रेफाइट ग्रे, लाइट ग्रे, ऑलिव्ह आणि पिंक. 128GB आवृत्तीची किंमत (अंदाजे रु. 43647.80) आहे, तर 256GB आवृत्तीची किंमत (अंदाजे रु. 54898.53) आहे. Samsung Galaxy a56 In Marathi |
इतर स्मार्टफोनची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नवनवीन स्मार्टफोन आणि इतर माहितीसाठी आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला नक्की जॉईन करा आणि सदरील माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा | धन्यवाद Samsung Galaxy a56 In Marathi