Samsung Galaxy M35 5G : Samsung कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M35 5G भारतात लॉन्च केला आहे. सर्वात पॉवरफुल बॅटरी आणि कॅमेरा या नवीन फोनचे आकर्षण आहे. यामध्ये अनेक फीचर्स आहे या सर्व फीचर्सची माहिती आपण पाहूया.
सॅमसंग कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M35 5G भारताच्या बाजारात उपलब्ध करून दिला आहे. या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे फोनची बॅटरी आणि कॅमेरा फोनची बॅटरी ही 6000 mAh देण्यात आली आहे आणि कॅमेरा 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये एमोल्ड डिस्प्ले, नॉक्स सिक्युरिटी टॅप आणि पे फिचर देण्यात आलेले आहे. सॅमसंगने 17 जुलै 2024 रोजी हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या आधी हा फोन दोन महिन्यापूर्वी ब्राझीलमध्ये लॉन्च करण्यात आला होता.
Samsung Galaxy M35 5G माहिती
सॅमसंग कंपनीने आपला सर्वात पॉवरफुल बॅटरी आणि कॅमेरा स्मार्टफोन Samsung Galaxy M35 5G लॉन्च केला असून सगळीकडे या फोनची चर्चा सुरु झाली आहे. 20 जुलै 2024 पासून अमेझॉन, सॅमसंग वेबसाईट आणि ऑफलाईन रिटेल स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे. 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 6000 mAh बॅटरी, अँड्रॉइड 14 , नॉक्स सिक्युरिटी टॅप आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे, असे अनेक फीचर्स या फोनमध्ये देण्यात आलेले आहे. हा स्मार्टफोन Redmi, Oppo, आणि Vivo यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची संपूर्ण माहिती.
Samsung m35 5g price
सॅमसंगने नवीन फोन लॉन्च केला असून फोनची किंमत कमी ठेवली असून कमी किंमतीत जास्त फीचर्स देण्यात आलेले आहे. फोनची विक्री 20 जुलै 2024 पासून अमेझॉन, सॅमसंग वेबसाईट आणि ऑफलाईन रिटेल स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे. फोनचे तीन व्हिरिएंट लॉन्च केले असून त्यांच्या किंमतीही कंपनीने जाहीर केल्या आहेत. बेस व्हिरिएंट 6GB + 128GB याची किंमत 19,999/- रुपये आहे. दुसरा व्हिरिएंट 8GB + 128GB याची किंमत 21,499/- रुपये आहे. आणि तिसरा व्हिरिएंट 8GB + 256GB याची किंमत 24,299/- रुपयांना उपलब्ध आहे.
मॉडेल | किंमत |
6GB + 128GB | 19,999/- |
8GB + 128GB | 21,499/- |
8GB + 256GB | 24,299/- |
हे पण वाचा⇓
Realme c63 | फक्त 9,000 मध्ये रिअलमी फोन लॉंच 50MP कॅमेरा | जाणून घ्या संपूर्ण माहिती
motorola edge 50 ultra | AI च्या जगात, No 1 AI स्मार्टफोन लॉंच | संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि माहिती
Samsung M35 5G Specifications
सॅमसंग कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 17 जुलै लॉन्च केला असून कमी किंमतीत जास्त फीचर्स असा हा फोन आहे फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
*बॅटरी*
Samsung Galaxy M35 5G या नवीन फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे फोनची दमदार बॅटरी आहे. बॅटरीच्या बाबतीत बोलायचं झाला तर 6000 mAh ची जबरदस्त अशी बॅटरी देण्यात आलेली आहे. आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे.
*कॅमेरा*
सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरा देण्यात आलेले आहे या ट्रिपल कॅमेराला OIS सपोर्ट मिळतो. यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड लेन्स कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 13 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
*डिस्प्ले*
Samsung Galaxy M35 5G फोनमध्ये ६.६ इंचचा फुल HD + सुपर एमोल्ड इन्फिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. (1080X2340) रेसुलुशन, आणि रिफ्रेश रेट 120Hz , आणि 1000 नीटस पर्यन्त पिक ब्रायनट्समध्ये येतो. फोन डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्ट्स + चे प्रोटेक्शन देखील दिले आहे.
*प्रोसेसर*
फोनच्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये ऑक्ट कोर Exynos 1380 चिपसेट देण्यात आली आहे. फोन अँड्रॉइड 14 वर चालतो त्यावर आधारित One UI 6.1 सह सादर करण्यात आला आहे. 5 वर्षासाठी अँड्रॉइड अपडेट आणि सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे.
*रॅम आणि स्टोरेज*
फोनच्या रॅम आणि स्टोरेज बद्दल यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज दिली आहे.
*ओएस*
सॅमसंग कंपनीने 5 वर्षासाठी अँड्रॉइड अपडेट्स आणि 4 वर्षासाठी सिक्युरिटी अपडेट्स सुविधा दिली आहे.
*कलर*
फोनमध्ये तीन कलर उपलब्ध केले आहे. Moonlight Blue, Daybreak and Thunder Grey.
*कनेक्टिव्हिटी*
फोनच्या कनेक्टिव्हिटी साठी ड्युअल सिम, 5G, 4G LTE, WiFi, Bluetooth 5.3, GPS, NFS सपोर्ट दिला आहे.
सॅमसंग कंपनीने असे जाहीर केले आहे की, Samsung Galaxy M35 5G फोनची विक्री 20 जुलै 2024 पासून अमेझॉन, सॅमसंग वेबसाईट, आणि सर्व रिटेल स्टोर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. फोनवर कंपनीने लिमिटेड ऑफर सुद्धा दिली आहे ही ऑफर अशी आहे की, सॅमसंगच्या सर्व व्हिरिएन्टवर 1000 रुपये डिस्काउंट दिला आहे आणि अतिरिक्त बँक कार्डवर सुद्धा 2000 रुपयांचा डिस्काउंट देणार आहे.