Shidha Patrika Tapasani In Marathi अपात्र शिधापत्रिका मोहीम राबण्याबाबत शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 15 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय काढून शिधापत्रिका तपासणी मोहीम राज्यात राबवायला सुरवात करण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याप्रमाणे, अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्यासाठी शिधापत्रिका तपासणी मोहीम राज्यात सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शिधापत्रिका तपासणीचा अर्ज भरून संबधीत शिधापत्रिका दुकानात/कार्यालयात जमा करणे, सर्व शिधापत्रिकाधारकांना बंधनकारक केले आहे.
Shidha Patrika Tapasani In Marathi
महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्यात मोहीम सुरु केली जाणार आहे. शिधापत्रिका तपासणी नमुना अर्ज कसा भरावा हे पाहण्याआधी ही मोहीम नेमकी काय आहे हे पाहुयात. त्यामुळे, शिधापत्रिका तपासणी नमुना अर्ज भरताना आपल्याला मदत होईल.
Ration card verification form pdf maharashtra
अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम काय आहे?
राज्यातील अपात्र असलेल्या बी.पी.एल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी (Shidha Patrika Tapasani In Marathi) करण्यासाठी दिनांक 15 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये ही मोहीम राबविण्यात यावी अश्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
राज्यात अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम राबवताना शासनाकडून पुढील महत्वाचे आदेश/सूचना देण्यात आल्या आहेत.
- शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत.
- सादर केलेल्या संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी.
- विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिलेली असणार नाही याची दक्षता घ्यावी.
- शिधापत्रिकेची तपासणी करताना, ज्या शासकीय/निमशासकीय/खाजगी कार्यालयातील कर्मचारी/कामगार यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात याव्यात.
- विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात याव्यात.अस्तित्त्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरीत व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे.
थोडक्यात शिधापत्रिकाधारक खरोखरच लाभ घेण्यासाठी पात्र आहेत काय? याची पाडताळणी करणे हा अपात्र शिधापत्रिका तपासणी (Shidha Patrika Tapasani In Marathi) मोहीमचा मुख्य उद्देश आहे.
शिधापत्रिका तपासणी नमुना अर्ज PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ⇒ Download
शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरायचा ?
- ज्या व्यक्तीच्या नावे शिधापत्रिका आहे त्या व्यक्तीचा फोटो फॉर्मच्या उजव्या बाजूला लावायचा आहे.
- त्यानंतर, तुमच्या गावाचे नाव, तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे.
- शिधापत्रिकाधारकांचे संपूर्ण नाव – म्हणजेच ज्यांचा (कुटुंब प्रमुखाचा) फोटो तुम्ही फॉर्मवर लावणार आहे, त्यांच्या आडनावाने सुरवात करून लिहायचे आहे. (उदा. आडनाव, पाहिले नाव, वडिलांचे नाव).
- त्यानंतर, त्यांचे वय लिहा, नागरिकत्व- भारतीय, व्यवसाय किंवा नोकरी करत आहेत काय ते टाका.
- त्यापुढे, जर व्यवसाय करत असाल तर, व्यवसायाचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे.
- त्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी लिहायची आहे म्हणजेच, तुमचे रेशनकार्ड बीपीएल/अंत्योदय/अन्नपूर्णा/केशरी/आस्थापना असे कोणत्या वर्गवारीत येतं तिथे टिक करा.
- त्यानंतर, शिधापत्रिकेचा अनुक्रमांक टाकायचा आहे. हा अनुक्रमांक तुमच्या रेशनकार्डच्या पहिल्या पानावर सर्वात वरच्या बाजूला ६ किंवा ७ अंकी नंबर असेल तो टाकायचा आहे.
- त्यापुढे, पूर्ण निवास पत्ता हा पर्याय दिसेल, त्या मध्ये तुमचा पत्ता म्हणजेच, रेशनकार्डवर असलेला पत्ता लिहायचा आहे आणि फॉर्म सॊबत टाकलेल्या पत्त्याचा पुरावा कागदपत्रे जोडावी लागतील.
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ पुणे महानगरपालिकेत लाडक्या बहिणीसाठी नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा
आवश्यक कागदपत्रे :
- आधारकार्ड
- भाडेपावती
- LPG जोडणी क्रमांक
- मतदार कार्ड
- बँक पासबुक
- लाईट बिल
- ड्रायविंग लायन्स
मित्रानो, (Shidha Patrika Tapasani In Marathi) शिधापत्रिका तपासणी फॉर्मसॊबत कुटुंब प्रमुखाच्या आधारकार्डशिवाय कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आधारकार्डची प्रत जोडून रेशन दुकानात द्या. फॉर्म दिल्यावर फॉर्मची पोच पावती घ्यायला मात्र विसरू नका.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |