शुभांशु शुक्ला भारताचे नवीन अंतराळवीर; कोण आहे ‘हा’ भारतीय अंतराळवीर, जे स्पेसमध्ये रचणार नवीन इतिहास | Shubhanshu Shukla Biography in Marathi

Shubhanshu Shukla Biography in Marathi भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी भारतीय अंतराळ इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. ते ‘अ‍ॅक्सिऑम मिशन 4’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. या मिशनमध्ये त्यांनी पायलट म्हणून भूमिका बजावली आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Shubhanshu Shukla Biography in Marathi

शुभांशु शुक्ला कोण आहेत :

– जन्म: 10 ऑक्टोबर 1985, लखनऊ, उत्तर प्रदेश
– शिक्षण: सिटी मॉन्टेसरी स्कूल, लखनऊ; नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA)
– भारतीय हवाई दलात नियुक्ती: जून 2006
– उड्डाण अनुभव: Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier, An-32 यांसह 2,000 तासांहून अधिक
– अंतराळ प्रशिक्षण: 2019 मध्ये रशियातील युरी गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये

मिशनवर येणारे अनुभव भारतीयांसोबत शेअर करण्याची अपेक्षा शुभांशु शुक्ला त्यांनी व्यक्त केली. मिशनबद्दल कुतूहल असल्याच त्यांनी सांगितलं. हे मिशन 14 दिवस चालणार आहे.
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला लवकरच नवीन इतिहास रचणार आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर (ISS) जाणारे ते पहिले भारतीय अवकाशवीर आहेत. त्यांना एक्सिओम मिशन 4 मध्ये (एक्स-4) पायलट म्हणून निवडण्यात आलं आहे. हे एक खासगी अवकाश मिशन आहे.Shubhanshu Shukla Biography in Marathi

हेही वाचा : क्लिक करा ⇒ आजचे सोन्याचे दर; 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोनं किती स्वस्त की महागलं? खरेदीची संधी, ताजे रेट पहा

स्पेसएक्स ड्रॅगन यानातून ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहेत. शुभांशु शुक्ला हे इंडियन एअर फोर्समध्ये पायलट आहेत. नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील पथकामधून ते ISS वर जाणार आहेत. मिशन कमांडर म्हणून शुभांशु शुक्ला यांची भूमिका असेल. त्यांच्यासोबत दोन मिशन एक्सपर्ट पोलंडचे स्लावोज उज्नान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू असतील.

Ax-4 सारखे खासगी मिशन्स

हे मिशन 14 दिवस चालणार आहे. या मिशनमध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वैज्ञानिक प्रयोग, आऊटरिच प्रोग्राम आणि कामर्शियल कार्यक्रम असतील. Ax-4 मिशन हे खासगी अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत घेऊन जाण्याच मिशन आहे. नासाच्या ISS कार्यक्रमाचे संचालक डाना वीगेल यांच्यानुसार, Ax-4 सारखे खासगी मिशन्स हे पृथ्वीच्या खालच्या कक्षेची लोकांना भ्रमंती घडवून एक नवीन अर्थव्यवस्था विकसित करण्याचा मार्ग आहे. व्हिटसन यांनी Ax-4 चालक दलाच कौतुक केलं.

अंतराळ मोहिमेतील सहभाग

शुभांशु शुक्ला यांची ‘गगनयान’ या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी निवड झाली होती. त्यानंतर, त्यांनी ‘अ‍ॅक्सिऑम मिशन 4’ अंतर्गत ISS वर जाण्याची संधी मिळवली. या मिशनमध्ये त्यांनी पायलट म्हणून भूमिका बजावली.Shubhanshu Shukla Biography in Marathi

व्यक्तिगत आयुष्य

शुभांशु शुक्ला यांची पत्नी कामना शुक्ला या एक दंतचिकित्सक आहेत. त्यांची प्रेमकहाणी बालपणापासूनची आहे. त्यांना एक मुलगा आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA Sector 12 Phase 2, 6500 घरांचे 80 टक्के काम पूर्ण, लॉटरी लवकरच? ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

प्रेरणादायी प्रवास

शुभांशु शुक्ला यांची कहाणी भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने भारतीय अंतराळ कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Shubhanshu Shukla Biography in Marathi वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी. 

Leave a Comment