10 लाख ते 1 कोटी पर्यंत सरकारी कर्ज योजना | stand up india scheme in marathi | स्टँड अप इंडिया योजना, effective अशी योजना

भारत सरकाने देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आणि महिलांसाठी स्टँड अप इंडिया (stand up india scheme in marathi) ही  योजना आणली आहे या योजनेचं मुख्य उद्धेश SC, ST आणि महिलांना नवीन उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी भारत सरकार आर्थिक सहाय्य करते या योजनेतून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि समस्या लोकांना होणार त्रास ह्या सर्व गोष्टींचा विचार करून ही योजना अगदी सोप्या पद्धतीने सुरु केलेली आहे. स्टॅन्ड अप इंडिया योजनेतून SC, ST आणि महिलांना उद्योग आणि व्यवसाहिक कर्ज १० लाख ते ०१ कोटी पर्यंत सरकार उपलब्ध करून देते. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्टँड अप  योजना इंडिया (stand up india scheme in marathi) संदर्भात येणारी सर्व माहिती या योजनेसाठी कोण पात्र आहे, काय कागदपत्रे लागतात, या योजनेतून काय काय फायदे होणार त्याची वैशिट्ये, आर्थिक व्याजदर किती आहे, योजने संबधित इतर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत एकदम सध्या शब्दात सामान्य लोकांना समजेल अशी या योजनेची माहिती देणार आहोत. ही माहिती सामान्य माणूस समजून घेऊन नक्कीच या योजनेचा लाभ घेईल. चला तर मग आपण माहिती पाहूया. 

Table of Contents

स्टँड अप इंडिया माहिती | stand up india scheme in marathi

भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना SC, ST आणि महिला यांना उद्योग व्यवसायात चालना देण्यासाठी १५ ऑगस्ट २०१५ रोजी स्टँड अप इंडिया योजना असेही म्हटले जाते. देशात महिलांना उद्योग व्यवसायात पुढे आण्यासाठी त्यानां व्यवसायात लागणारे कर्ज उपलब्ध करून देणे व्यवसाय यशस्वी होण्यासाठी इतर प्रकारची मदत करणे हे सरकारचे उद्देश आहे ही योजना SC, ST आणि महिलांनासाठी आहे. या सरकारी कर्ज योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांना सर्व प्रकारच्या बँकांकडून सरकार मार्फत कर्ज दिले जाते.

योजनेमध्ये बँक कर्ज रुपये १० लाख ते १ कोटी पर्यंत आहे, रुपये १० लाख कर्ज हे संयुक्त बँक कर्ज (म्हणजे मुदतीचे कर्ज आणि खळत्या भांडवलासह) आणि रुपये ०१ कोटी हे कर्ज ग्रीनफिल्ड इंटरप्रझेसच्या स्थानपनेसाठी किमान एक तरी SC किंवा ST कर्जदार आणि एक महिला कर्जदाराला कोणत्याही बँकेत जामिनाशिवाय कर्ज दिले जाते हा उपक्रम कोणत्याही उद्योगिक क्षेत्रात केला जाऊ शकतो जसे कि, उत्पादन, कृषी संबधीत क्रियाकलप किंवा विविध व्यापार असू शकतो. जर समजा इंटरप्राझेस गैर वैयक्तिक असेल तर किमान ५१% शेअर होल्डिंग आणि कंट्रोलिंग टेक SC, ST किंवा महिला व्यवयसायिकडे असणे आवश्यक आहे.

स्टँड अप इंडिया योजना नवीन अपडेट | stand up india scheme in marathi new update 

स्टँड अप इंडिया योजनेची मुदत २०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे भारत सरकारने यात काही बद्दल केले आहेत ते खालीलप्रमाणे
कर्जदाराला मार्जिन पैशाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या २५% पर्यंत वरून १५% पर्यन्त कमी करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत दिले जाणारे कर्ज १० लाख ते १ कोटीपर्यन्त असले शेती संबधीत उपक्रमासाठी कर्ज दिले जाईल.
उदाहरण  : मधमाशी पालन, मस्त्यपालन, कुकुटपालन, पशुपालन, वर्गीकरण, एकत्रीकरण कृषी उद्योग, दूध व्यवसाय कृषी केंद्रे, कृषी प्रक्रिया, संगोपन, आणि कृषी यांना समर्थ देणाऱ्या सेवा या योजनेसाठी पात्र राहतील.

स्टँड अप इंडिया योजना उध्दिष्टे | Stand Up India Scheme in marathi Objectives

  • योजनेचा मुख्य उद्धेश भारत देशातील अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST आणि महिला यांना उद्योगात आणि व्यवसायात आणे आणि त्यांना प्रगतशील करणे.
  • ग्रीनफिल्ड इंटरप्राझेसच्या स्थापनेसाठी आर्थिक मदत प्रधान करणे SC, ST आणि महिला उद्योगजकांना १० लाख ते १ कोटी पर्यन्त कर्ज उपलब्ध करून देणे.
  • देशातील महिला स्वतःचा उद्योग व व्यवसाय सुरु करून प्रगतशील होतील.
  • स्टँड अप इंडिया योजनेच्या मार्फत ५ लाख लाभार्थीना बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणार आहे.
  • ज्यांना उद्योग, व्यवसाय, उत्पादन, आणि सेवा क्षेत्राशी संबधीत व्यवसाय सुरु करायचा आहे अशा SC, ST आणि महिला यांना महिलांना स्टँड अप इंडिया योजनेतून व्यावसायिक कर्ज उपलब्ध होईल.
  • कर्जाची रक्कम १० लाख ते १ कोटी रुपये पर्यंत आहे त्यामध्ये सर्व बँक शाखांनी कमीत कमी एक महिला उद्योजग आणि SC, ST उद्योजकांना स्टँड अप इंडिया योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे.
स्टँड अप इंडिया योजना वैशिष्ट्ये | Stand Up India Scheme in marathi Features
  • स्टँड अप इंडिया योजना फक्त SC, ST आणि महिला यांच्यासाठी कर्ज देणारी योजना आहे.
  • SC, ST आणि महिला १० लाख ते १ कोटीपर्यन्त कर्ज हे उद्योगासाठी, व्यवसाय, व्यापार किंवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक कर्ज मदत देते.
  • मुदत कर्ज आणि खेळते भांडवल या सह प्रकल्प खर्चाच्या ८५% संमिश्र कर्ज या योजने अंतर्गत मिळू शकते.
  • व्याजदर बँकेच्या सर्वात कमी लागू दार असेल (बेस रेट) पेक्षा कमी नसावा.
  • स्टँड अप लोनसाठी (CGFSIL) क्रेडिट गैरंटी फंड स्कीमच्या हमीमार्फत देखील कर्ज सुरक्षित केले जाऊ शकते.
  • योजनेतील कर्ज ७ वर्षाच्या कालावधीत १८ महिन्याच्या कमाल स्थगिती कालावधीसह परतफेड करण्यात यावे.
  • योजनेच्या सुविधेसाठी कर्जदाराला रूपे डेबिट कार्ड दिले जाईल.
स्टँड अप इंडिया योजनेचे फायदे | Benefits of Stand Up India Scheme in marathi
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि महिलांना केंद्र सरकार स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि महिलांना विविध उद्योग व व्यवसायाची संधी उपलब्ध होते. 
  • योजनेतून १० लाख ते १ कोटी पर्यंत कर्ज सरकारतर्फे देण्यात येते.
  • या योजनेत क्रेडिट काढण्यासाठी Rupay डेबिट कार्ड दिले जाईल 
  • मार्जिन मनी योजने अंतर्गत पात्र व्यवसायिकांनी १० स्वहिता भरणा केल्यानंतर बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेमार्फत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्ववरित २५% सुबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येईल.
  • या योजनेमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या उद्योग आणि व्यवसाय यांना ३ वर्ष इनकम टॅक्सची सूट देण्यात आली आहे.
  • देशातील महिलांना उद्योगासाठी शेतीसाठी प्रोसाहन मिळते.
  • कागतपत्रे जमा करण्याची पद्धत सोपी आहे. 
  • या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाइन वेबसाईटच्या माध्यमातून करून शकतात.
  • गरीब आणि मध्यम वर्गासाठी ही योजना त्यांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी एकदम प्रभावी योजना आहे.
  • स्टँड अप इंडिया मार्फत सुरुवातीला प्रशिक्षण दिले जाते, त्याच बरोबर पुढील २ वर्ष मदत केली जाते.
स्टँड अप इंडिया योजनेसाठी पात्रता | Stand Up India in marathi eligibility
  • अर्जदार हा भारतच राहवासी असावा 
  • अर्जदार वयाचे १८ वर्ष पूर्ण असावी.
  • अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला हे पात्र असतील.
  • कंपनीची वार्षिक उलाढाल २५ कोटी पेक्षा कमी असावी.
  • अर्जदार बँक डीफोल्डर नसावा.
  • कंपनी भागीदार फर्म , प्रायव्हेट लिमिटेड /एलएलपी असणे आवश्यक असावे.
  • ग्रीनफिल्ड प्रकल्पसाठी कर्ज दिले जाऊ शकते असा व्यवसाय जो उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात उयोजनकाने प्रथमच सुरु केला असावा.
  • गैर वयक्तिक इंटरप्रझेसच्या बाबतीत ५१% होल्डिंग आणि कंट्रोलिंग स्टॅक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजकडे असावा.
स्टँड अप इंडिया योजनेसाठी कागदपत्रे | Documents for Stand Up India Scheme in marathi 
  • वयाचा पुरावा 
  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • जातीचा दाखल (महिलांसाठी जातीच्या दाखलाची आवशक्यता नाही)
  • रहवासी प्रमाणपत्र 
  • बँक पासबुक 
  • कंपनी, उद्योग, किंवा व्यवसायाचा पत्ता
  • कंपनी, उद्योग, किंवा व्यवसायाचा अहवाल 
  • प्रकल्प अहवाल 
  • उद्योगासाठी जागा भाड्याने असेल तर भाडेकरार लागेल.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • उद्योग , व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र 
  • इतर अजून काही कागतपत्र लागतील लागू शकतात
स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत कर्जसाठी बँक यादी | List of banks for loans under Stand Up India Scheme in marathi 
  • बँक ऑफ महाराष्ट्र 
  • बँक ऑफ बरोडा
  • स्टेट बँक ऑफ इंडिया 
  • कॅनरा बँक 
  • इंडियन बँक 
  • यूको बँक 
  • बंधन बँक 
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया 
  • पंजाब आणि सिंध बँक 
  • इंडियन ओव्हरसीसी बँक 
  • ICICI बँक 
  • IDBI बँक 
  • ऍक्सिस बँक 
  • पीएनबी बँक 
  • जम्मू आणि काश्मीर बँक लि.
  • युनियन बँक ऑफ इंडिया 
स्टँड अप इंडिया योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | stand up india scheme online apply 
  • सर्व प्रथम स्टँड अप इंडिया योजनेची अधिकृत वेबसाईट www.udyamimitra.in ओपन करा.
stand up india scheme online apply 
stand up india scheme online apply
  • अधिकृत वेबसाईट ओपन झाली की, लॉगिन वर क्लीक करा. नंतर New Registration वर क्लीक करा.
stand up india scheme
stand up india scheme
  • या नंतर तुमच्या स्क्रीनवर तीन ऑप्शन येतील 1) New Entrepreneur 2) Existing Entrepreneur 3) Self Employed Professional या तीन ऑप्शन पैकी तुम्हा कोणत्या श्रेणीत अर्ज करायचा आहे ते निवडा.
  • त्यानंतर नाव, तुमचा मोबाइल नंबर आणि ई-मेल id माहिती टाका. 
  • पुढे generate OTP क्लीक करा. otp आल्यानंतर तो टाकणे. नंतर रेजिस्ट्रावर क्लीक करा.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्याच्यात सर्व आवश्यक माहिती नीट भरणे.
Stand Up India Scheme Features
Stand Up India Scheme Features
  • सर्व माहित व्यवस्थित भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्व झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लीक करा.
  • अश्या प्रकारे तुमचा स्टॅन्ड अप इंडिया योजने अंतर्गत फॉर्म सबमिट होईल

मुद्रा योजनेत मिळेल 10 लाखांपर्यन्त कर्ज, जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे, फायदे येथे क्लीक करा.⇐

5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा | जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया, पात्रता, फायदे येथे क्लीक करा.⇐

मुलींसाठी 1 लाख हवे आहे ? तर जाणून घ्या, लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता येथे क्लीक करा.⇐

स्टँड अप इंडिया योजना अर्ज स्थिती पहाण्यासाठी प्रक्रिया | stand up india scheme online status check 
  • स्टँड अप इंडिया योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाणे.
stand up india scheme online status check 
stand up india scheme online status check
  • पुढे एक स्क्रीन ओपन होईल मोबाइल नंबर टाकून otp येईल तो टाकणे.
  • तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
स्टँड अप इंडिया योजना संपर्क 

टोलफ्री हेल्पलाईन नंबर : 1800-180-1111 / 022-67221526
अधिकृत वेबसाईट : www.udyamimitra.in
ई-मेल id : support@standupmitra.in /  help@standupmitra.in

स्टॅंड अप इंडिया योजना Youtube विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा.⇐

FAQ’s :- स्टॅंड अप इंडिया योजने संदर्भातील प्रश्न व त्यांची उत्तरे 

प्रश्न : स्टॅंड अप इंडिया योजना stand up india scheme in marathi काय आहे?
उत्तर : देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आणि महिलांसाठी उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकार कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते.

प्रश्न : कितीपर्यन्त कर्ज उपलब्ध होते?
उत्तर : योजनेतून १० लाख ते १ कोटी पर्यंत कर्ज सरकारतर्फे देण्यात येते.

प्रश्न : योजनेसाठी अर्ज कसा करावा.
उत्तर : स्टँड अप इंडिया योजनेची अधिकृत वेबसाईट www.udyamimitra.in ऑनलाइन फॉर्म भरणे.

प्रश्न : कर्ज परतफेडीचा कालावधी किती आहे?
उत्तर : कर्ज परफेडीचा कालावधी ७ वर्ष, १८ महिन्याच्या कमाल स्थगित कालावधीसाठी.

प्रश्न : स्टॅंड अप इंडिया योजनेसाठी कोण पात्र आहे?
उत्तर : अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला हे पात्र असतील. १८ वर्ष पूर्ण असावे.

सारांश :
आज आपण या लेखात नवीन उद्योगकांना  स्टँड अप इंडिया योजना (stand up india scheme in marathi) मार्फत १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यन्त कर्ज सरकार उपलब्ध करून देते आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे तरी तुम्हाला  स्टँड अप इंडिया (stand up india scheme in marathi) बाबत काही शंका प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कंमेंट करा तुमच्या कंमेंट ला नक्की रिप्लाय येईल. हि माहिती तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरु नका.

 

 

 

 

Leave a Comment